Ganpati DP Images & Ganesh Chaturthi 2022 Wishes: सोशल मीडियासाठी बाप्पाचे Profile Pictures आणि HD Wallpapers घेऊन आलो आहोत, पाहा
गणेशोत्सवात सोशल मीडियावर अपडेट करण्यासाठी भगवान गणेशाचे प्रोफाइल चित्र, गणपती बाप्पाच्या प्रतिमा आणि HD वॉलपेपर आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत, पाहा
Ganpati DP Images & Ganesh Chaturthi 2022 Wishes: गणेशोत्सव हा वार्षिक हिंदू सण आहे जो ज्ञान आणि बुद्धीचे देवता, भगवान गणेशाची उपासना करण्यासाठी साजरा केला जातो. हिंदू दिनदर्शिकेतील भाद्रपद महिन्याच्या सहाव्या महिन्यातील चतुर्थी तिथीला गणेशोत्सवाची सुरवात करण्यात आली होती. गणेशोत्सवाची सुरुवात 31 ऑगस्ट, बुधवारपासून होत असल्याने, भक्त गणेशाच्या आगमनासाठी आतुर झाले आहेत. गणपतीच्या मुर्ती, सजावट, मोदक, आकर्षक रोषणाईने बाजारपेठा सजल्या आहेत. गणेशोत्सव दरम्यान गणपती बाप्पाच्या आगमनासाठी सार्वजनिक ठिकाणी गणपतीचे भव्य पंडाल बांधले जात आहेत. उत्सव भव्य आणि उत्साहात साजरा करण्यासाठी महिन्या भरापासून तयारी सुरु झाली आहे. दरम्यान, गणेशोत्सवात सोशल मीडियावर अपडेट करण्यासाठी भगवान गणेशाचे प्रोफाइल चित्र, गणपती बाप्पाच्या प्रतिमा आणि HD वॉलपेपर आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. भारतातील विविध राज्यांमध्ये गणेश चतुर्थी मोठ्या थाटामाटात साजरी केली जाते. सार्वजनिक आणि खाजगी भागात होणार्या सणासुदींबरोबरच व्हर्च्युअल सेलिब्रेशनलाही समकालीन काळात प्राधान्य मिळाले आहे. भक्तांना प्रसिध्द गणपती पंडालचे थेट दर्शन आणि थेट प्रसादही मिळतो. मुंबईचा लालबागचा राजा, चिंचपोकळीचा राजा, अंधेरीचा राजा इत्यादी काही संस्था ऑनलाइन दर्शनाची सुविधा देतात. ऑनलाइन सेलिब्रेशनमध्ये मित्र आणि कुटुंबियांना गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा, विनायक चतुर्थी 2022 प्रतिमा, गणेशोत्सव संदेश, HD वॉलपेपर आणि कोट्स पाठवून उत्सवाच्या शुभेच्छा शेअर करणे देखील गरजेचे आहे. गणेश चतुर्थी 2022 साठी गणपती DP प्रतिमा, गणपती बाप्पा प्रोफाइल चित्र आणि भगवान गणेशाचे वॉलपेपर डाउनलोड करून व्हर्च्युअल सेलिब्रेशनही उत्साहात साजरे करा.[ हे देखील वाचा: Ganeshotsav 2022 Dates: हरतालिका, ज्येष्ठा गौरी पूजन ते अनंत चतुर्दशी यंदा गणेशोत्सवातील पहा महत्त्वाच्या सणांच्या तारखा!]
गणपती बाप्पाच्या HD Wallpapers :
गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा! विनायक चतुर्थीच्या आधी आपल्या जवळच्या व्यक्तींना शेअर करून साजरा करा, गणेशोत्सव. आम्ही सादर केलेल्या गणपतीच्या डीपी प्रतिमांसह तुमचे सोशल मीडिया प्रोफाइल चित्र अपडेट करा. व्हाट्सएप, फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर आणि इतर सोशल मीडिया हँडलसाठी भगवान गणेशाचीचे Profile Pictures आणि HD Wallpapers आम्ही घेऊन आलो आहोत, सर्वांना गणेशोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा