Ganesh Visarjan at Home: गणपती विसर्जन कसे करतात? जाणून घ्या उत्तर पूजा विधी ते व्हर्च्युअल गणेश विसर्जनाचे प्लॅन्स!

मूळ नक्षत्रावर गौरी विसर्जन होत असल्याने यंदा 27 ऑगस्ट दिवशी दुपारी 12.36 पासून गौरी- गणपती विसर्जनाला सुरूवात केली जाऊ शकते.

Ganesh Visarjan | Photo Credits: Pixabay

Ganesh Visarjan 2020 Uttar Puja:   महाराष्ट्रामध्ये आज (27 ऑगस्ट) गौरी-गणपतींचे विसर्जन (Gauri Ganpati Visarjan) केले जाणार आहे. यंदा गणेशोत्सवावर कोरोनाचं सावट असल्याने मुंबई, पुणे सह राज्यात नागरिकांना साधेपणाने गणेशोत्सव (Ganeshotsav) साजरा करत विसर्जन देखील शक्य असल्यास घरच्या घरी करा असं आवाहन करण्यात आलं आहे. दरम्यान कोरोना संकट काळात सण सुरक्षितपणे साजरा करताना पारंपारिक रिती-भाती जपत आज गौराईसोबत बाप्पाला निरोप देणार असाल तर पहा घरच्या घरी यंदा गणपती विसर्जन कसे करावे? बाप्पाच्या निरोपाची घरी तयारी करताना उत्तर पूजा (Ganpati Visarjan Uttar Puja) कशी करतात? नैवैद्य कशाचा असतो आणि यंदा गौरी गणपती विसर्जनाचा मुहूर्त काय? Ganesh Visarjan 2020 Message: गणपती विसर्जन निमित्त मराठमोळी WhatsApp Stickers, Quotes, Images शेअर करून मंगलमय करा गणेशोत्सवातील शेवटचा दिवस.

महाराष्ट्रात भाद्रपद शुक्ल चतुर्थी दिवशी गणरायाचं आगमन होतं. त्यानंतर किमान दीड ते 10 दिवस बाप्पा घरी विराजमान होतात. अनेक ठिकाणी गणेश विसर्जन हे 5,7 दिवसांनी देखील करण्याची प्रथा आहे. मग यंदा गणेशोत्सवामध्ये दरवर्षी सारखी धामधूम नसली तरीही व्हर्च्युअली गणपती विसर्जनाचं आयोजन केले असेल तर पहा बाप्पाला निरोप कसा द्याल?  Gauri Ganpati Visarjan 2020 Puja Timing: गौरी गणपती विसर्जनाची मुहूर्त वेळ, पूजा विधी जाणून घेत पहा यंदा घरच्या घरी कसा द्याल बाप्पाला निरोप!

व्हच्युअल गौरी- गणपती विसर्जन

यंदा गणपतीची मिरवणूक निघणार नसल्याने तुमच्या नातेवाईकांना, मित्र मंडळींना ऑनलाईन माध्यमातूनच गौरी- गणपती विसर्जनाची सोय उपलब्ध करून द्या. यामध्ये तुम्ही घरच्या घरी ढोल-ताशाच्या गजरात बाप्पाला निरोप देऊ शकता. Ganesh Visarjan 2020 Guidelines: कोविड-19 संकटाच्या पार्श्वभूमीवर गणपती विसर्जनासाठी BMC कडून नवी नियमावली जारी

गौरी-गणपती विसर्जन उत्तर पूजा

घरातील ज्येष्ठ व्यक्ती गौरी-गणपतीच्या विसर्जनापूर्वी मंत्रोच्चाराने बाप्पाच्या मूर्ती मध्ये केलेली प्राणप्रतिष्ठेच्या माध्यमातील देवत्त्व काढून घेतात. निरोपाची एकत्र आरती म्हणून बाप्पाला विसर्जनाला नेले जाते. दरम्यान घरच्या घरी मोठा टब, बादली, घंघाळामध्ये बाप्पाला विसर्जित करण्यापूर्वी त्यामध्ये स्वच्छ पाणी भरून त्यामध्ये हळद-कुंकू, फुलांच्या पाकळ्या, गंगेचे पाणी मिसळून ठेवा. विसर्जनाची मूर्ती 3 वेळेस पाण्यात भिजवून नंतर पूर्ण मूर्ती बुडवा.

गणेश विसर्जनानंतर पाटाची पुन्हा आरती करून नैवेद्य, प्रसादाचे वाटप करून श्रीगणेशाला अखेरचा निरोप द्या. बाप्पाला निरोप देताना दही-भाताचा नैवेद्य शिदोरी म्हणून सोबत देण्याची प्रथा आहे. दरम्यान मूळ नक्षत्रावर गौरी विसर्जन होत असल्याने यंदा 27 ऑगस्ट दिवशी दुपारी 12.36 पासून गौरी- गणपती विसर्जनाला सुरूवात केली जाऊ शकते.