Ganesh Visarjan 2024 Dates: गणेशोत्सवामध्ये यंदा दीड, 5,7,10 आणि गौरी-गणपतींच्या विसर्जनाच्या तारखा काय? घ्या जाणून

तर गौरींचं आवाहन 10 सप्टेंबरला होणार आहे. अनंत चतुर्दशी अर्थात 17 सप्टेंबरला दहा दिवसांच्या सार्वजनिक मंडळांमधील गणपतींचं विसर्जन होते.

Ganesh Visarjan | Image Used For Representational purpose Only | Photo Credits: Pixabay.com)

गणपतीचं घरा घरामध्ये उत्साहात स्वागत केल्यानंतर तितक्याच जड अंतकरणाने विसर्जन देखील केले जाते. गणेशोत्सवामध्ये (Ganeshotsav)  दीड दिवस, पाच दिवस, सात दिवस, दहा दिवस गणपतींचं पूजन केल्यानंतर त्याला निरोप दिला जातो. गणेश विसर्जन देखील मोठ्या धामधूमीमध्ये करण्याची महाराष्ट्रात रीत आहे. ढोल ताशाच्या नादावर थिरकत गणेशभक्त लाडक्या बाप्पाला निरोप देतात. त्यामुळे गणेशोत्सवामध्ये विसर्जनमिरवणूका पाहणं देखील विशेष आकर्षण आहे. मुंबई मध्ये सार्वजनिक गणेशोत्सवातील विसर्जन मिरवणूक 17-18 तास चालत असतात. खोल समुद्रात जाऊन त्याचे विसर्जन केले जाते.  मग जाणून घ्या यंदा गणेशोत्सवात गणेश विसर्जनाच्या (Ganesh Visarjan) तारखा काय आहेत? कधी कोणत्या गणपतींचं विसर्जन केले जाणार?

गणेश विसर्जन 2024 तारखा

दीड दिवसांच्या गणपतींचं विसर्जन - 8 सप्टेंबर

पाच दिवसांच्या गणपतींचं विसर्जन - 11 सप्टेंबर

गौरी- गणपती विसर्जन - 12 सप्टेंबर

सात दिवसांच्या गणपतींचं विसर्जन -13 सप्टेंबर

दहा दिवसांच्या गणपतींचं विसर्जन - 17 सप्टेंबर

(नक्की वाचा: Pune Ganeshotsav 2024: विसर्जन मिरवणुकीत ‘लेझर लाईट्स' वर बंदी; मानाच्या मंडळाच्या बैठकीत पोलीस आयुक्तांचा निर्णय). 

गणपतीचं विसर्जन हे जवळच्या समुद्र, तलाव किंवा पाणवठ्याच्या ठिकाणी केलं जातं. आजकाल पर्यावरणपुरक गणेशमूर्ती साकारल्या जात असल्याने त्यांचे विसर्जन अगदी घरगुती स्वरूपात देखील केले जाते. गणेश विसर्जनाला मोठ्या संख्येने भाविक एकत्र येऊन विसर्जन मिरवणूका देखील काढतात.