Ganesh Jayanti 2024 Wishes In Marathi: गणेश जयंतीच्या शुभेच्छा WhatsApp Status, Facebook Messages द्वारा देत द्विगुणित करा बाप्पांच्या भाविकांचा आनंद !

गणेश जयंती निमित्त तुमच्या मित्रमंडळींना, नातेवाईकांना, बाप्पांच्या भक्तमंडळींना माघी गणेशोत्सवाच्या शुभेच्छा देत या दिवसाचा आनंद द्विगुणित करायला विसरू नका.

माघी गणेश जयंती । File Image

Happy Ganesh Jayanti 2024: माघ शुद्ध चतुर्थीचा दिवस हा गणेशभक्तांसाठी खास दिवस आहे. वरद चतुर्थी, तिलकुंद चतुर्थी म्हणून देखील हा दिवस ओळखला जातो. पण त्यासोबतच या दिवशी गणपती बाप्पाचा जन्मोत्सव देखील साजरा केला जातो. त्यामुळे या निमित्ताने माघी गणेशोत्सव (Maghi Ganeshotsav) साजरा करत गणेश जयंती साजरी करण्याची रीत आहे. यंदा ही गणेश जयंती (Ganesh Jayanti) 13 फेब्रुवारी दिवशी आहे. गणेश जयंतीला बाप्पाची विशेष पूजा केली जाते. मग अशा या मंगलमय दिवसाच्या शुभेच्छा तुमच्या नातेवाईकांना, मित्रमंडळींना, प्रियजणांना देत हा दिवस खास करण्यासाठी ही मराठमोळी ग्रीटींग्स, शुभेच्छापत्र, WhstsApp Status, Stickers, GIFs, Facebook Messages, Wishes तुम्ही शेअर करू शकता.

माघी गणेशोत्सवामध्येही भाद्रपद गणेश चतुर्थी प्रमाणे बाप्पाच्या मूर्तीला घरी आणून तिची प्राणप्रतिष्ठा केली जाते. विधिवत पूजा करून दीड दिवसाचा गणेशोत्सव साजरा करत बाप्पाचं गाजत वाजत विसर्जनही होतं. या दिवशी गणेश मंदिरं देखील आकर्षक फुलांच्या सजावटीने आणि भाविकांच्या गर्दीने तुफान असतात. Ganpati Rangoli Simple Design: माघी गणेश चतुर्थीनिमत्त घरासमोर, अंगणात आणि मंडळासमोर काढा 'या' सोप्या बाप्पाच्या रांगोळी डिझाईन्स, Watch Videos .

गणेश जयंती च्या शुभेच्छा

माघी गणेश जयंती । File Image

वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ

निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा

गणेश जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!

माघी गणेश जयंती । File Image

हार फुलांचा घेऊनी | वाहु चला हो गणपतीला ||

आद्य दैवत साऱ्या जगाचे | पुजन करुया गणरायाचे ||

माघी गणेशोत्सवाच्या सर्वांना शुभेच्छा !

माघी गणेश जयंती । File Image

वंदितो तुज चरण आर्जव करतो गणराया

वरदहस्त असूद्या माथी

राहूद्या सदैव छत्रछाया

गणपती बाप्पा मोरया

गणेश जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!

माघी गणेश जयंती । File Image

गणेश जयंतीच्या बाप्पाच्या भाविकांना

मनापासून शुभेच्छा!

माघी गणेश जयंती । File Image

माघी गणेश जयंतीच्या सार्‍या गणेश भक्तांना शुभेच्छा,

हा मंगलमय दिवस तुमच्या आयुष्यात सुख, शांती, समृद्धी

घेऊन येवो हीच श्रींच्या  चरणी प्रार्थना !

माघी गणेशोत्सवाच्या शुभेच्छा

गणपती हा गणांचा ईश असल्याने त्याची कोणत्याही शुभ कामाला सुरूवात करण्यापूर्वी पूजा करण्याची हिंदू संस्कृती आहे. गणपतीला पहिला मान देत कार्य सुरू करून ते सिद्धीस जावो म्हणजेच सफळ संपूर्ण व्हावं अशी मागणी केली जाते. गणपती बाप्पा हाच सुखकर्ता आणि दु:खहर्ता असल्याने मनातील इच्छा, मनोकामना पूर्ण व्हाव्यात आणि दु:ख, कष्ट हरण व्हावेत यासाठी विशेष प्रार्थना केली जाते.