Ganesh Chaturthi 2020 Puja Samagri: श्रीगणेशाच्या पूजेसाठी आवश्यक लागणारी साहित्य कोणती? येथे पाहा संपूर्ण यादी
यावर्षी श्रीगणेशाचे आगमन 22 ऑगस्ट रोजी होणार आहे. घरगुती गणेशोत्सव हा किमान दीड, अडीच, पाच, सात आणि दहा दिवस साजरा केला आहे.
Ganpati Puja Samgri List: महाराष्ट्रात गणेशोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. यावर्षी श्रीगणेशाचे आगमन 22 ऑगस्ट रोजी होणार आहे. घरगुती गणेशोत्सव हा किमान दीड, अडीच, पाच, सात आणि दहा दिवस साजरा केला आहे. दरम्यान, गणेश मूर्तीची परंपरेनुसार, विधीवत प्राणप्रतिष्ठा केली केली. दरम्यान, प्राणप्रतिष्ठेच्या पूजेसाठी अनेकजण भटजींकडून पूजा करून घेतात. मात्र आजकाल घरगुती गणपतींची संख्या वाढत असल्याने, अनेकदा ऐनवेळी भटजींही मिळत नाहीत. महत्वाचे म्हणजे, गणपतीची प्रतिष्ठापनासाठी आवश्यक असणाऱ्या पूजा साहित्यांची पुरेसी माहिती नसल्याने अनेकांचा गोंधळ उडतो. मात्र, यावर्षी गणेश भक्तांचा गोंधळ उडू नये म्हणून पूजेसाठी लागणाऱ्या साहित्यांची यादी खाली देण्यात आली आहे. यामुळे अनेकांना याचा फायदा होणार आहे.
या वर्षी श्रीगणेशाचे आगमन 22 ऑगस्ट 2020 रोजी होणार आहे. 21 ऑगस्ट रात्री 11. 02 मिनिटांपासून चतुर्थीचा आरंभ होणार आहे. त्यानंतर रविवारी सकाळी 7.57 मिनिटांनी ही तिथी संपणार आहे. पूजेचा मुहूर्त रविवारी सकाळी 11. 06 पासून दुपारी 1 वाजून 42 मिनिटापर्यंत असणार आहे. स्नान करुन घरातील देवांची पूजा करुन नंतर गणेशाची प्राणप्रतिष्ठापना करावी. हे देखील वाचा-Ganesh Chaturthi 2020 Mehndi Designs: गणेश चतुर्थी निमित्त हातावर काढून पाहा या सुंदर गणपती मेहंदी डिझाइन (See Photos and Video Tutorials)
श्रीगणेशाच्या पूजेसाठी आवश्यक लागणारे साहित्य-
हळद, कुंकू, अक्षता, गुलाल, अष्टगंध, सुपारी 10, खारीक 5, बदाम 5, हळकुंड 5, अक्रोड 5, ब्लाउज पीस 1, कापसाची वस्त्रे, जानवी जोड 2, पंचा 1, तांदूळ, तुळशी, बेल, दुर्वा, फुले, पत्री, हार 1, आंब्याच्या डहाळे, नारळ 2, फळे 5, विड्याची पाने 25, पंचामृत, कलश 2, ताम्हण 1, पळी, पंचपात्र, सुटे पैसे, नैवेद्याची तयारी, समई, वाती, निरांजन, कापूर.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशातील अनेक धार्मिक, सांस्कृतिक आणि सामजिक कार्यक्रम रद्द किंवा लॉकडाऊनच्या निर्बंधांखाली साजरा करावी लागली आहे. यामुळे दरवर्षी गाजावाजा करत साजरा करण्यात येणारा गणेशोत्सव यंदा अतिशय साधेपणाने पार पडणार आहे. ज्यामुळे अनेकांमध्ये नाराजी पसरली आहे. महत्वाचे म्हणजे, गणेशोत्सवात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये, यासाठी महाराष्ट्र सरकारने मार्गदर्शक सूचनाही जारी केल्या आहेत.