Ganesh Chaturthi 2022: गणेश चतुर्थी दिवशी चंद्राचं दर्शन करू नये या सल्ल्यामागे सांगितली जाते पुराणातील ही कथा!

बाप्पाचे भाविकांना असे का सांगितले जाते यामागील पुराणातील कथा देखील घ्या जाणून!

Lord Ganesha (Photo credits: File image)

गणेश चतुर्थीचा (Ganesh Chaturthi) दिवस हा गणरायांच्या भक्तांसाठी खास असतो. दरवर्षी या दिवसाची ते तितक्याच जल्लोषामध्ये वाट पाहत असतात. दरम्यान बाप्पाच्या आगमनाची आणि विसर्जनाची निराळीच धूम असते. या निमित्ताने वर्षातले 10 दिवस चैतन्यमय वातावरणामध्ये जातात. बाप्पाचं आगमन झालं की त्याचे भक्तगण आपसूकच स्वतःसाठी शिस्त लावून घेतात. यामध्ये काही रीती-भाती या परंपरागत येतात. काहींचा उल्लेख पुराणांमधील कथांमध्येही आहे. अशापैकीच एक म्हणजे गणेश चतुर्थीला चंद्र दर्शन करू नये. बाप्पाचे भाविकांना असे का सांगितले जाते यामागील पुराणातील कथा देखील घ्या जाणून!

गणेश चतुर्थीला चंद्र दर्शन का करू नये?

पुराणात सांगितलेल्या गणपती बाप्पाच्या कथेनुसार, ' बाप्पा घाई गडबडीमध्ये आपलं वाहन मूषकावरून जात असताना तोल जाऊन पडले. हे पाहून आभाळातला चंद्र हसला. बाप्पांना चंद्राचं हसणं आवडलं नाही म्हणून त्यांनी चंद्राला शाप दिला आणि म्हणाले गणेश चतुर्थी दिवशी कुणीही तुझं तोंड पाहणार नाही. जो पाहील त्याच्यावर चोरीचा खोटा आळ येईल. चंद्र हे ऐकून घाबरला. त्याने बाप्पांना विनवणी केली आणि असं न करण्याचं आवाहन केलं. आपलं दर्शन चुकून झाल्यास विनाकारण निष्पाप व्यक्तीवर चोरीचा आळ येईल. मग त्याची यामधून सुटका कशी करायची? त्यावर बाप्पा म्हणाले त्यांनी संकष्टी चतुर्थीला व्रत करावं.

बाप्पा आणि चंद्राचं अशाप्रकारे खास नातं आहे. संकष्टी चतुर्थीला बाप्पा साठी ठेवलेला दिवसभराचा उपवास रात्री चंद्रदर्शनानंतर सोडला जातो. हे देखील नक्की वाचा: How To Make Ukaliche Modak: गणपतीच्या आवडीचे उकडीचे मोदक बनवायचे आहे का ? पाहा व्हिडीओ .

टीप: सदर लेख केवळ माहिती देण्याच्या उद्देशाने लिहण्यात आला आहे. यामधील गोष्टींची लेटेस्टली मराठी पुष्टी करत नाही. आमचा अंधश्रद्धा पसवण्याचा कोणताही हेतू नाही.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif