Ganesh Chaturthi 2021 Wishes in Marathi: गणेश चतुर्थी निमित्त मराठी शुभेच्छा, Quotes, Greetings, Images शेअर करुन करा गणपती बाप्पाला वंदन!
Ganesh Chaturthi Wishes in Marathi: गणेश चतुर्थी निमित्त मराठी Messages, Quotes, Greetings, Images आणि GIF's सोशल मीडियाच्या फेसबुक (Facebook), व्हॉट्सअॅप (WhatsApp), ट्विटर (Twitter), इंस्टाग्राम (Instagram) वर शेअर करुन द्या गणेशोत्सवाच्या शुभेच्छा....
Ganesh Chaturthi Wishes in Marathi: उद्या भाद्रपद शुद्ध चतुर्थी म्हणजेच गणेश चतुर्थी. घरोघरी गणरायाचे आगमन होईल. सार्वजनिक मंडळांमध्ये बाप्पा विराजमान होईल. महाराष्ट्रासह देशभरात हा सण साजरा केला जातो. यामुळे सर्वत्र भक्तीमय, मंगलमय, आनंदी, उत्साही वातावरण असते. गणपती बाप्पांच्या आगमनानंतर पुढील काही दिवस भारावलेले असतात. अशीच सर्वांची लाडकी गणेश चर्तुथी यंदा शुक्रवार, 10 सप्टेंबर रोजी आहे. या निमित्ताने मराठी Messages, Quotes, Greetings, Images आणि GIF's सोशल मीडियाच्या फेसबुक (Facebook), व्हॉट्सअॅप (WhatsApp), ट्विटर (Twitter), इंस्टाग्राम (Instagram) वर शेअर करुन द्या गणेशोत्सवाच्या शुभेच्छा.
गणेश चतुर्थीला मखर, आरास, बाप्पा आणणे, पूजा, आरती, नैवेद्य यांची लगबग असते. नंतर प्रत्येक घराच्या प्रथेप्रमाणे दीड, पाच, सात किंवा दहा दिवस बाप्पाची सेवा केली जाते. भजन, जागरण असे कार्यक्रम रंगतात. कुटुंबातील सदस्य एकत्र येऊन गणेशोत्सव साजरा करतात. तर सार्वजिनिक मंडळांमध्ये विविध सांस्कृतिक कार्यक्रम होतात. मात्र यंदा देखील कोरोनाचे संकट कायम असल्यामुळे सरकारने घालून दिलेल्या नियमांचे पालन करत गणेशोत्सव साजरा करा. (Ganeshotsav 2021: लालबागचा राजा ते पुण्याचा दगडूशेठ गणपती, यंदा कोविड 19 संकटाच्या पार्श्वभूमीवर घरबसल्या कुठे घेऊ शकाल बाप्पाचं दर्शन; इथे पहा!)
गणेश चतुर्थी शुभेच्छा!
गणरायाच्या स्वागताची जय्यत तयारी झाली
मेघांच्या वर्षावाने फुलांची आरास बहरली
आंनदाने सर्व धरती नटली
तुझ्या आगमनाने मनाला तृप्ती मिळाली
गणेश चतुर्थीच्या भक्तीमय शुभेच्छा!
तुमच्या मनातील सर्व मनोकामना पूर्ण होवोत ,
सर्वांना सुख, समृध्दी, ऎश्वर्य,शांती,आरोग्य लाभो
हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना
गणपती बाप्पा मोरया!
मंगलमुर्ती मोरया!!
बाप्पाच्या येण्याने चैतन्य बहरले
दुःख आणि संकट दूर पळाले
तुझ्या भेटीची आस लागते
तुझ्या नामस्मरणात वर्ष सरून जाते
अखेर गणेश चतुर्थीला भेट घडते…
श्री गणेश चतुर्थीच्या मंगलमय शुभेच्छा!
मोदकांचा प्रसाद केला
लाल फुलांचा हार सजवला
मखर नटून तयार झाले
वाजत गाजत बाप्पा आले
गुलाल फुले अक्षता उधळे
बाप्पाच्या स्वागतासाठी जमले सगळे…
गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा
सजली अवघी धरती,
पाहण्यास तुमची कीर्ती..
तुम्ही येणार म्हटल्यावर,
नसानसात भरली स्फ़ुर्ती..
आतुरता फक्त आगमनाची,
कारण चतुर्थी आमच्या गणेशाची…
गणपती बाप्पा मोरया!
GIF's
प्रेमाने आणि श्रद्धेने पूजलेल्या गणपतीला निरोप देताना सर्वांची मनं भरुन येतात आणि आपोआप मुखातून 'गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या', हे शब्द बाहेर पडतात. तुम्हाला सर्वांनाही लेटेस्टली मराठी कडून गणेश चतुर्थी आणि गणेशोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा!
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)