Ganesh Chaturthi 2020 Pran Pratishthapana Muhurat: गणपती बाप्पाची प्राणप्रतिष्ठापना करण्याचा गणेश चतुर्थी 2020 चा मुहूर्त, पुजा विधी घ्या जाणून

किंवा आजकाल युट्युब वर गणेशोत्सवात गणपतीची प्राणप्रतिष्ठा कशी करायची? याची सविस्तर माहिती सांगणारे अनेक पूजा विधींचे व्हिडिओ उपलब्ध आहेत.

Ganesh Chaturthi Pran Pratishtha Puja 2020 | Photo credits: Unsplash

Ganpati Bappa Pran Pratishtha Puja Muhurat: यंदा बाप्पाच्या आगमनाची वाट पाहणार्‍या गणेश भक्तांची प्रतिक्षा 22 ऑगस्ट दिवशी संपणार आहे. कारण दरवर्षी प्रमाणे यंदा भाद्रपद शुक्ल चतुर्थी म्हणजे गणेश चतुर्थीला (Ganesh Chaturthi) जगभरात गणेशभक्त गणरायाच्या मूर्तीचं पूजन करणार आहेत. मात्र मूर्ती आणल्यानंतर त्याची प्राणप्रतिष्ठा (Pran Pratishtha) करण्याची प्रथा आहे. परंतू यंदा कोरोना संकटकाळात सोशल डिस्टंसिंग पाळत अनावश्यक गर्दी टाळण्याचं आवाहन करण्यात आले आहे. त्यामुळे यंदा प्रत्येकाच्या घरी भटजींच्या हस्ते बाप्पाची पूजा किंवा प्राणप्रतिष्ठा करणं शक्य नाही. अशावेळेत सुरक्षित गणेशोत्सव साजरा करण्यासाठी तुम्ही घरच्या घरीच गणरायाची षोडोपचार पूजा आणि प्राण प्रतिष्ठेची पूजा करू शकता. Ganesh Chaturthi 2020 Puja Samagri: श्रीगणेशाच्या पूजेसाठी आवश्यक लागणारी साहित्य कोणती? येथे पाहा संपूर्ण यादी.  

डिजिटल युगामध्ये तुम्ही ही पूजा भटजींच्या सांगण्यानुसार ऑनलाईनच्या मदतीने करू शकता. किंवा आजकाल युट्युब वर गणेशोत्सवात गणपतीची प्राणप्रतिष्ठा कशी करायची? याची सविस्तर माहिती सांगणारे अनेक पूजा विधींचे व्हिडिओ उपलब्ध आहेत. दरम्यान कालानिर्णय सारख्या कॅलेंडरच्या अ‍ॅपवर गणेश भक्तांसाठी पूजेचे व्हिडिओ, आरती संग्रह अपलोड करण्यात आले आहे. त्याच्या मदतीने तुमच्या सोयीने तुम्ही पूजा करू शकता. Gauri Ganpati Invitation Messages in Marathi: गणेशोत्सवात गौरी-गणपतीच्या दर्शनाला पाहुण्यांना आमंत्रित करण्यासाठी WhatsApp Messages आणि Images

बाप्पाच्या प्राणप्रतिष्ठेचा मुहूर्त -

22 ऑगस्ट दिवशी गणेश चतुर्थी दिवशी घराघरात, सार्वजनिक मंडळामध्ये बाप्पा विराजमान होतील. 22 ऑगस्ट दिवशी संध्याकाळी 7.57 पर्यंत भाद्रपद शुक्ल चतुर्थी आहे. त्यामुळे याच दिवशी गणेशस्थापना केली जाईल. गणेशस्थापना मध्यान्हकाली करण्याची परंपरा आहे. शनिवार, 22 ऑगस्ट रोजी सकाळी 11.25 पासून दुपारी 1.56 पर्यंत मध्यान्हकाली श्रीगणेशमूर्ती स्थापना करावी असा सल्ला पंचांगकर्ते दा. कृ. सोमण यांनी दिला आहे.

घरच्या घरी प्राणप्रतिष्ठापना पूजा कशी कराल?

गुगल प्ले स्टोअर उपलब्ध अ‍ॅप्स

कालनिर्णय - https://bit.ly/32iSh4z

पितांबरी - https://bit.ly/2o0axOi

मोबाईल किंवा टॅबवर वरील पैकी कोणतेही अ‍ॅप डाऊनलोड करून तुम्ही प्राणप्रतिष्ठेची पूजा एकून साग्रसंगीत करू शकता.

दरम्यान यंदा कमीत कमी लोकांमध्ये, घरच्या घरी आणि साधेपणाने गणेशोत्सव साजरा करा असे आवाहन प्रशासनाकडून गणेशभक्तांना करण्यात आले आहे. गणेशमूर्तीची कमाल उंची 4 फूट असेल. तर यंदा मिरवणूका, आगमन, विसर्जन सोहळा, धामधूम नसेल.