Ganesh Chaturthi 2020 निमित्त मुंबई, दिल्ली सह इतर गणेश मंदिरात गणरायाची पूजा संपन्न (Watch Videos)
आरती पार पडली. याचे व्हिडिओज, फोटोज समोर आले आहेत. गणेश चतुर्थी निमित्त मुंबई, नागपूर, दिल्लीसह विविध गणेश मंदिरात आज गणरायाचे दर्शन तुम्ही या फोटो, व्हिडिओद्वारे अगदी घरबसल्या घेऊ शकता.
आज गणेश चतुर्थी (Ganesh Chaturthi). संपूर्ण देशभरात गणरायाच्या आगमनाच्या या सणाचा उत्साह पाहायला मिळत आहे. आजचा दिवस प्रत्येक गणेश भक्तासाठी अत्यंत खास आहे. घरोघरी, सार्वजनिक मंडळांत आज गणपती बाप्पाची प्राणप्रतिष्ठापना केली जाईल. त्यानंतर आरती करुन बाप्पा विराजमान होतील. कोरोनाचे सावट असले तरी गणेश चतुर्थीचा आनंद ओसरलेला दिसत नाही. बाप्पाच्या आगमनाची लगबग, तयारी आणि उत्साह सर्वत्र पाहायाला मिळत आहे. आज देशभरातील विविध गणेश मंदिरांमध्ये गणरायाची पूजा संपन्न झाली. आरती पार पडली. याचे व्हिडिओज, फोटोज समोर आले आहेत. गणेश चतुर्थी निमित्त मुंबई (Mumbai), नागपूर (Nagpur), दिल्ली (Delhi) सह विविध गणेश मंदिरात आज गणरायाचे दर्शन तुम्ही या फोटो, व्हिडिओद्वारे अगदी घरबसल्या घेऊ शकता. (गणपती बाप्पाची प्राणप्रतिष्ठापना करण्याचा गणेश चतुर्थी 2020 चा मुहूर्त, पुजा विधी घ्या जाणून)
पहा फोटोज, व्हिडिओज:
मुंबईतील सिद्धिविनायक मंदिरातील आरतीचा व्हिडिओ.
नागपूर मधील टेकडी गणपती मंदिरातही आज गणेश चतुर्थीच्या निमित्त आरती करण्यात आली.
द्वारका येथील श्री सिद्धि विनायक मंदिरातील गणेश चतुर्थी निमित्त आरती करण्यात आली.
दिल्लीतील कनॉट प्लेस येथील मंदिरातील पूजेचा व्हिडिओ.
कोरोना व्हायरसच्या संकटामुळे सणाच्या उत्साहावर काही बंधनं आली आहेत. त्यामुळे गणपती मंदिरात गर्दी पाहायला मिळत नाही. अगदी मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत पूजा, आरती संपन्न झाल्याचे पाहायाला मिळत आहे. दरम्यान, तुम्ही देखील गणेशोत्सवाच्या उत्साहाच्या भरात सरकारने घालून दिलेल्या नियमांचे उल्लंघन होणार नाही, याकडे लक्ष द्या.