Gandhi Jayanti 2021 HD Images: महात्मा गांधी जयंती निमित्त WhatsApp Status, Wishes, Facebook Messages शेअर करण्यासाठी एचडी इमेज

संयुक्त राष्ट्र महासभा (United Nations General Assembly) द्वारा 2 ऑक्टोबर हा दिवस आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन (International Day Of Non-Violence) म्हणून साजरा केला जातो. अलिकडच्या काळात जगाला अहिंसेच्या मार्गाने जाण्याचा संदेश देणारा महात्मा म्हणून महात्मा गांधी यांना ओळखले जाते.

राष्ट्रपीता महात्मा गांधी (Mahatma Gandhi) यांची जयंती 2 ऑक्टोबरला देशभर साजरी केली जाते. संयुक्त राष्ट्र महासभा (United Nations General Assembly) द्वारा 2 ऑक्टोबर हा दिवस आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन (International Day Of Non-Violence) म्हणून साजरा केला जातो. अलिकडच्या काळात जगाला अहिंसेच्या मार्गाने जाण्याचा संदेश देणारा महात्मा म्हणून महात्मा गांधी यांना ओळखले जाते. त्यांची जयंती (Gandhi Jayanti 2021) देशभरात मोठ्या उत्साहाने साजरी केली जाते. महात्मा गांधी यांचे नाव मोहनदास करमचंद गांधी असे आहे. लोक त्यांना बापूजी म्हणत असत. महात्मा गांधी म्हणत असत की माझ्या मृत्यूनंतर माझा जन्मदिन साजरा केला जाईल किंवा नाही ही माझ्यासाठी कसोटी असेल. थोर वैज्ञानिक अल्बर्ट आईन्स्टाईन यांनी उद्गार काढले होते की, काही वर्षांनी मानवाला प्रश्न पडेल की खरोखरच महात्मा गांधी यांच्यासारखा महामानव पृथ्वीतलावावर जन्माला आला होता.  महात्मा गांधी जयंती निमित्त WhatsApp Status, Wishes, Facebook Messages शेअर करण्यासाठी एचडी इमेज (Gandhi Jayanti 2021 HD Images) इथे देत आहोत. ज्या आपण डाऊनलोड करु शकता.

 

 

 

गांधी जयंती दिवशी भारतात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. नवी दिल्ली येथे राजघाटावर गाधींच्या समाधीसमोर श्रद्धांजली अर्पण केली जाते. पंतप्रधानांच्या उपस्थितीत प्रार्थना केली जाते. याच ठिकाणी महात्मा गांधी यांच्यावर अंतिम संस्कार करण्यात आले होते.

महात्मा गांधी यांनी ब्रिटीशांविरोधात आजन्म संघर्ष केला. त्यांचे जीवन अनेकांसाठी प्रेरणादायी आहे. मोहनदास करमचंद गांधी यांचा विवाह 13 वर्षांच्या कस्तूरबा गांधी यांच्याशी झाला होता. महात्मा गांधी शिक्षणासाठी विलायतेला गेले होते. चार वरषांनी ते परत आले त्यानंतर ते दक्षिण आफ्रिकेला गेले. तिथे त्यांना वर्णद्वेशाचा सामना करावा लागला. तेथून त्यांच्या संघर्षाला सुरुवात झाली. भारतीय चळवळीतील त्यांचे योगदान अतुलनीय आहे.