Gajanan Maharaj Prakat Din 2026 Wishes, Images: 'गण गण गणात बोते' म्हणत गजानन महाराज प्रकट दिनानिमित्त द्या शुभेच्छा, Wallpapers, Greetings शेअर करुन दिवस करा मंगलमय!
२३ फेब्रुवारी १८७८ रोजी शेगावात प्रथम दर्शन देणाऱ्या संत गजानन महाराजांचा १४८ वा प्रकट दिन ८ फेब्रुवारी २०२६ रोजी साजरा होत आहे. त्यानिमित्त शेगावमधील सोहळा आणि भक्तांसाठी शुभेच्छांची खास माहिती.
श्री संत गजानन महाराज यांचा 148 वा प्रकट दिन परवा, रविवारी 8 फेब्रुवारी 2026 रोजी साजरा होत आहे. या मोठ्या उत्सवासाठी शेगाव नगरी सज्ज झाली असून राज्यभरातून लाखो भाविक पायदळ दिंड्यांसह शेगावात दाखल होत आहेत. माघ वद्य सप्तमी या तिथीचे औचित्य साधून दरवर्षी हा सोहळा अत्यंत भक्तिमय वातावरणात पार पडतो.
परवा सकाळी मंदिरात ब्रह्ममुहूर्तावर काकड आरती आणि श्रींचा अभिषेक केला जाईल. मुख्य प्रकट दिन सोहळा दुपारी १२ वाजता पार पडणार आहे. याच वेळी श्रींच्या 'गजानन विजय' ग्रंथाचे पारायण आणि भजन-कीर्तनाची सांगता होईल. दुपारी १२ वाजता होणाऱ्या पुष्पवृष्टीसाठी मंदिर प्रशासनाने विशेष व्यवस्था केली असून पूर्ण मंदिर परिसर फुलांनी सजवण्यात आला आहे.
गजानन महाराज प्रकट दिन मराठी शुभेच्छा
यंदा प्रकट दिनानिमित्त भक्तांमध्ये डिजिटल शुभेच्छांचे विशेष आकर्षण दिसत आहे. अनेक तरुण भक्तांनी महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त विशेष प्रतिमा (Images) आणि स्टेटस तयार केले आहेत. सोशल मीडियावर "श्री गजानन महाराज प्रकट दिनाच्या हार्दिक शुभेच्छा" असे संदेश आतापासूनच व्हायरल होऊ लागले आहेत.
प्रकट दिनानिमित्त शेगावच्या श्री गजानन महाराज संस्थानमध्ये सात दिवसांपासूनच धार्मिक कार्यक्रमांना सुरुवात झाली आहे. ८ फेब्रुवारी रोजी पहाटेपासूनच मंदिरात काकड आरती, महापूजा आणि विशेष अभिषेक करण्यात येत आहेत.