Father’s Day 2022 Gift Ideas:फूट मसाजरपासून ते कॉकटेल कुक बुकपर्यंत, फादर्स डे निमित्त वडिलांसाठी 5 खास भेटवस्तू, पाहा यादी
वडीलांना विशेष वाटण्यासाठी मुले विविध मार्ग शोधतात. वडीलांना डिनरला घेऊन जातात किंवा त्यांच्या आवडीच्या भेटवस्तू खरेदी करून त्यांना गिफ्ट करतात. वडिलांबद्दल प्रेम दाखवण्यासाठी सर्वकाही करतात. आणि वडिलांपती प्रेम व्यक्त करतात.
Father’s Day 2022 Gift Ideas:फादर्स डे हा दिवस लवकरच येत आहे. दरवर्षी तिसरा रविवार हा फादर्स डे म्हणून साजरा केला जातो. या वर्षी फादर्स डे 19 जून रोजी आहे. फादर्स डे जगभरात मोठ्या आनंदाने साजरा केला जातो. या दिवशी वडीलांना विशेष वाटण्यासाठी मुले विविध मार्ग शोधतात. वडीलांना डिनरला घेऊन जातात किंवा त्यांच्या आवडीच्या भेटवस्तू खरेदी करून त्यांना गिफ्ट करतात. वडिलांबद्दल प्रेम दाखवण्यासाठी सर्वकाही करतात. फादर्स डे साजरा करत असताना, आम्ही भेटवस्तूंची यादी तयार केली आहे जी तुम्हाला या फादर्स डेला तुमच्या वडिलांसाठी चांगले गिफ्ट ठरवण्यात मदत करू शकते. जे तुमच्या वडिलांना विशेष आणि प्रिय वाटतील!
वायरलेस चार्जिंग स्टेशन
वडिलांसाठी ही एक अनोखी भेट आहे जी फोन वायरलेस चार्ज करते .
क्राफ्ट बिअर क्लब सबस्क्रिप्शन
जर तुमचे वडील पार्टी फ्रीक असतील तर ही सर्वोत्तम भेटवस्तूंपैकी एक आहे. ही गोष्ट तुम्ही आणि तुमच्या वडिलांनी कदाचित कधीच ऐकली नसेल, पण हे नक्कीच त्यांच्या चेहऱ्यावर एक मोठं हसू आणणार आहे.
डॅश कॅम मिनी 2
ही अशी गोष्ट आहे जी तुमच्या वडिलांना आवडेल. जर त्यांना राईड करायला आवडत असेल तर डॅश कॅममध्ये ते सर्व रेकॉर्ड करू शकता.
फूट मसाजर
दिवसभर कामाच्या थकव्यानंतर, तुमच्या वडिलांना थोडी विश्रांती हवी असते. हा हायटेक आणि चांगला उपाय आहे.
वेलनेस-ओरिएंटेड मसाजर
वेलनेस-ओरिएंटेड मसाजर हे वडीलांना देण्यासाठी हे एक चांगले गिफ्ट असेल.
कॉकटेल बनवण्याची जपानी कला
तुमच्या निवृत्त वडिलांसाठी एक उत्कृष्ट कूकबुक आहे जे या फादर्स डेला तुमच्या वडिलांना तुम्ही देऊ शकता. फादर्स डेला त्यांना या अनपेक्षित आणि अनोख्या भेटवस्तू देऊन त्यांचा दिवस खास बनवा. सर्वांना फादर्स डे २०२२ च्या शुभेच्छा.
(The above story first appeared on LatestLY on Jun 16, 2022 01:35 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

