Eid Mubarak 2021 HD Images: 'रमजान ईद'निमित्त खास Greetings, Wishes, WhatsApp Status, Messages द्वारे शुभेच्छा देऊन साजरा करा Eid ul-Fitr सण

मात्र यंदा देशावर कोरोनाचे सावट असल्याने हा सण गर्दी न करता अत्यंत साधेपणाने साजरा करण्याचे आवाहन केले गेले आहे.

Eid Mubarak 2021 (File Image)

Eid Mubarak 2021 Images: रमजान महिन्यातील रोजे संपल्यानंतर मुस्लीम बांधव जे आनंदाचे पर्व साजरे करतात ते म्हणजे ‘रमजान ईद’ (Ramadan Eid 2021). रमजान महिन्यात तिसावा रोजा झाल्यानंतर जो चंद्र दिसतो, त्याला ईद का चांद मानले जाते व त्यानंतर ईदच्या सणाला सुरुवात होते. या सणाला ‘ईद उल-फितर’ (Eid al-Fitr 2021) असे संबोधतात. आपापसात बंधुत्वाचे संबंध प्रस्थापित करून प्रेम व आनंदाने साजरा केला जाणारा सण अशी त्याची ओळख आहे. यावर्षी 14 मे रोजी रमजान ईद साजरी केली जाईल. ईद उल-फितर हा अरबी भाषेतील शब्द आहे. ईद या शब्दाचा अर्थ आनंद असा आहे, तर फितर म्हणजे दान करणे.

ईदला नवीन वस्त्र परिधान करून मुस्लिम बांधव ईदगाह किंवा मशिदीत नमाज अदा करतात. मात्र यंदा देशावर कोरोनाचे सावट असल्याने हा सण गर्दी न करता अत्यंत साधेपणाने साजरा करण्याचे आवाहन केले गेले आहे. अशा या पवित्र दिनी आपण खास HD Images, Greetings, SMS, Wishes, GIFs, Images, WhatsApp Status च्या माध्यमातून मुस्लिम बांधवांना शुभेच्छा देऊ शकता.

Eid Mubarak 2021
Eid Mubarak 2021
Eid Mubarak 2021
Eid Mubarak 2021
Eid Mubarak 2021

मुस्लिम बांधवांचा असा विश्वास आहे की, रमजान महिन्यात उपवास ठेवल्याने त्यांचे प्राण शुद्ध होतात आणि त्यांना नरकापासून मुक्ती मिळते. याच आनंदात आणि अल्लाने रोजे ठेवण्याचे बळ दिले म्हणूनही 'ईद' चा सण साजरा केला जातो. यादिवशी दानाला विशेष महत्व आहे. जंग-ए-बदार' ची लढाई जिंकल्यानंतर खुद्द पैगंबरांनी त्यांच्या अनुयायांसह पहिली 'ईद-अल-फितर' साजरी केली होती.