Eid Mubarak 2020 Wishes: रमजान ईद च्या शुभेच्छा मराठी Messages, GIF Images, WhatsApp Stickers, Facebook Greetings च्या माध्यमातून शेअर करून 'ईद उल फितर' चा सण करा स्पेशल!
जगभरातील मुस्लिम बांधवांना रमजान ईदच्या शुभेच्छा देऊन ईद उल फितर मुबारक म्हणत सणाचा आनंद द्विगुणित करण्यासाठी नक्की शेअर करा ही मराठमोळी शुभेच्छापत्र, ग्रिटिंग्स
Happy Eid-ul-Fitr 2020 Marathi Wishes: इस्लाम धर्मियांसाठी पवित्र असलेला पाक महिना रमजान आता संपला आहे. शव्वाल चंद्रकोरीच्या दर्शनानंतर आता भारतामध्ये आबालवृद्ध मुस्लिम बांधवांना उत्सुकता असलेला रमजान ईदचा (Ramadan Eid) सण आला आहे. जगभरात चंद्र दर्शनानुसार रमजान ईद म्हणजेच 'ईद उल फितर'(Eid Ul Fitr) चा दिवस वेगळा असला तरीही उत्साह सारखाच आहे. यंदा कोरोना व्हायरस संकटामुळे चांद रातच्या शुभेच्छा, ईदच्या शुभेच्छा तुम्ही मित्रमंडळी, नातेवाईक आणि प्रियजनांना गळाभेट घेऊन देऊ शकत नसलात तरीही इंटरनेट आणी सोशल मीडियाच्या माध्यमातून तुम्ही नक्कीच फेसबूक, व्हॉट्सअॅप मेसेंजर, स्टेट्सच्या माध्यमातून रमजान ईदचा आनंद द्विगुणित करू शकता. रमजान ईदच्या मराठमोळ्या शुभेच्छा, ईद उल फितर मुबारक (Eid Ul Fitr Mubarak) म्हणत यंदा जगाच्या कुठल्याही टोकावर बसून तुमच्या आयुष्यातील खास व्यक्तीला ईदला यंदा एक स्माईल नक्की भेट देऊ शकता. मग लेटेस्टली टीमने बनवलेल्या या मराठमोळ्या रमजान ईदच्या शुभेच्छा, ग्रीटिंग्स, शुभेच्छापत्र, मेसेजेस, वॉलपेपअर्स, GIF Images ते व्हॉट्सअॅप स्टिकर्स शेअर करून 'ईद उल फितर' चा यंदाचा सण खास करू शकता. Chand Raat Mubarak 2020 Greetings: चांद रात मुबारकच्या शुभेच्छा Wishes, Messages, Greetings, GIF Images, HD Wallpapers च्या शेअर करून खास करा तुमच्या मुस्लिम मित्र- मैत्रिणींचा यंदाचा ईदचा सण.
रमजान महिन्यामध्ये यंदा 30 दिवसांचा रोजा पूर्ण करून रमजान ईद साजरी केली जाणार आहे. पुर्वीसारखी यंदा रमजान ईदला झगमगाट, गर्दी नसली तरीही एकोप्याने, संयमाने पण तितक्याच उत्साहात यंदा ईद साजरी करण्याचं आवाहन आहे. मग हा ईदचा आनंद मित्रपरिवार आणि नातेवाईकांसोबत शेअर करण्यासाठी ही रमजानची मराठमोळी शुभेच्छापत्र शेअर करायला विसरू नका.
रमजान ईद मुबारक! शुभेच्छापत्र
यंदाची रमजान ईद तुम्हांला आणि तुमच्या परिवाराला
सुख, शांती, समृद्धी आणि आनंद घेऊन येवो
हिच आमची सदिच्छा
ईद उल-फ़ित्र च्या हार्दिक शुभेच्छा!
रमजान ईद मुबारक!
तुम्हा सार्यांना ईद उल-फ़ित्र च्या मन:पूर्वक शुभेच्छा!
ईद उल-फ़ित्र सणाच्या समस्त मुस्लीम बांधवांना
खूप खूप शुभेच्छा...
ईद मुबारक!
सर्व मुस्लिम बांधवांना 'रमजान ईद' च्या शुभेच्छा!
ग्रिटिंगकार्डप्रमाणे आता व्हॉट्सअॅप स्टिकर्सच्या माध्यमातूनही रमजान ईद मुबारक अशा शुभेच्छा शुभेच्छा तुम्ही देऊ शकता. त्यासाठी प्ले स्टोअर वर ईद मुबारकचा व्हॉट्सअॅप स्टिकर पॅक डाऊनलोड करा आणि एकमेकांना यंदा डिजिटल माध्यमातून गळाभेट द्या.
रमजान ईद हा अत्यंत पवित्र महिना असल्याने यामध्ये अल्लाहकडे पूर्ण भक्तीभावाने केलेली प्रार्थना तो पूर्ण करतो. या काळात जन्नतचे दरवाजे उघडे असतात अशीदेखील अनेक मुस्लिम धर्मियांची धारणा आहे. रमजानच्या काळात रोजा ठेवले जातात, कुराण पठण, 5 वेळेस नमाज अदा करणं अशा भक्तिमय पर्वची सांगता रमजान ईद दिवशी तितकीच आनंदाने करा. लेटेस्टली परिवाराकडून तुम्हांला रमजान ईदच्या खूप सार्या शुभेच्छा!