Eid Moon Sighting in Aurangabad, Pune, Nashik and Mumbai Chand Raat 2019: औरंगाबाद, पुणे, नाशिक, पुणे येथे आज दिसू शकतो ईदचा चांद

चंद्रदर्शनाने या महिन्याची सांगता होईल.

Eid Mubarak 2019 (Photo Credits: File Photo)

मुस्लिम बांधवांसाठी पवित्र असणाऱ्या रमजानच्या महिन्यातील आज 29 वा रोजा आहे. चंद्रदर्शनाने या महिन्याची सांगता होईल. आज संध्याकाळी महाराष्ट्रातील औरंगाबाद, पुणे, नाशिक, मुंबई या भागात ईदचा चांद दिसू शकतो. चंद्रदर्शनानंतर ईदचा उत्सव साजरा केला जाईल.

या पवित्र आणि आनंदी सणानिमित्त सर्व मुसलमान बांधव नवीन पोशाख परिधान करुन एकत्र जमतात. या भेटीच्या ठिकाणाला ‘ईदगाह’ असे म्हणतात. एकत्र नमाज पडून मग गळाभेट घेत एकमेकांना ‘ईद मुबारक’ अशा शुभेच्छा देतात. (रमजान ईद निमित्त सौंदर्य खुलवण्यासाठी खास, ट्रेंडी मेहंदी डिझाईन्स, पहा Videos)

ईद निमित्त विविध खाद्यपदार्थांची मेजवानी असते. तर शीरखुर्माचे विशेष महत्त्व असते. तसंच लहान मुलांना खाऊ खाण्यासाठी पैसे दिले जातात. त्यास ‘ईदी’ असे म्हणतात.