Eid-e-Milad un Nabi 2019 Mehndi Designs: ईद-ए-मिलाद-उन-नबी च्या निमित्ताने या सोप्प्या, ट्रेंडी अरेबिक मेहेंदी डिझाइन्स काढून खुलवा तुमच्या हातांचे सौंदर्य (Watch Video)
या डिझाइन्स अगदी कमीत कमी वेळात काढून तुम्ही आपल्या हाताचे सौंदर्य वाढवू शकता..
मुस्लिम बांधवांचा पवित्र सण ईद-ए-मिलाद-उन-नबी (Eid-e-Milad un Nabi) म्हणजेच मवालीद अल-नबी-अल शरीफ (Mawlid al-Nabi al-Sharif) आज 9 नोव्हेंबर च्या संध्याकाळपासून सुरु होणार असून उद्या म्हणजेच 10 नोव्हेंबर रोजी ईदचा चंद्रमा पाहून समाप्त होईल. जगातील बहुतांश इस्लामिक देशात साजऱ्या केल्या जाणाऱ्या या सणाला भारतीय मुस्लिम बांधव देखील दरवर्षी आनंद उल्हासात सेलिब्रेशन करतात.या निमित्ताने सर्व कुटुंबीय, मित्र परिवार एकत्र येतात त्यामुळे मग तयारीही तशीच खास हवी.. हो ना? या तयारीत महिलांचा उत्साह नेहमीप्रमाणेच भरपूर असतो, रंगीत कपडे घालून दागदागिन्यानी सजून आपला बेस्ट लूक साकारण्याकडे त्या अगदी बारकाईने लक्ष देतात. या तयारीतील आणखीन एक महत्वाची बाब म्हणजे मेहेंदी. चला तर मग यंदाच्या ईद-ए-मिलाद-उन-नबी च्या निमित्ताने काही सोप्प्या आणि ट्रेंडी मेहेंदी (Mehendi Designs) डिझाइन्सचे गाईड पाहुयात.. या डिझाइन्स अगदी कमीत कमी वेळात काढून तुम्ही आपल्या हाताचे सौंदर्य वाढवू शकता..
पूर्वीच्या काळी हातावर शुभ शकुन म्ह्णून मेहेंदीचे ठिपके काढण्याची पद्धत होती कालांतराने अनेक महिला हातभर मेहेंदी काढू लागल्या. हे बदलते ट्रेंड आता अरेबिक मेहेंदीवर येऊन थांबले आहेत. हातावर नाजुकशी नक्षी छोटी फुले, वेली यांनी सजवलेले हात तुमच्या सौंदर्यात भर टाकतात. यासाठी या खास ट्रेंडी मेहेंदी डिझाइन्स.. यंदा नक्की ट्राय करा..
अरेबिक मेहेंदी डिझाइन्स
ईद-ए-मिलाद-उन-नबीच्या दिवशी शीर- कुर्मा, बिर्याणी व अन्य चविष्ट पदार्थांची मोठी मेजवानी आयोजित केली जाते, एकत्र येऊन एकमेकांना शुभेच्छा देत सोहळे साजरे केले जातात. या कार्यक्रमात नातेवाईक मित्र मैत्रणी यांची भेट होते, अशावेळी तुमच्या हातावरची ही मेहेंदी नक्की भाव खाऊन जाईल!