IPL Auction 2025 Live

Dussehra 2022 Special Ukhane: दसरा सणाच्या निमित्ताने कुटुंबियांचा हट्ट पुरवण्यासाठी सुवासिनी घेऊ शकतात 'हे' खास उखाणे, वाचा

आम्ही तुमच्यासाठी दसऱ्याला घेण्यात येणारी काही खास उखाणे घेऊन आलो आहोत.

Dussehra 2022 Special Ukhane (File Image)

Dussehra 2022 Special Ukhane: यावर्षी शारदीय नवरात्रीला 26 सप्टेंबरपासून सुरुवात होत आहे. शारदीय नवरात्रीच्या नऊ दिवसांनंतर दहाव्या दिवशी दसरा हा सण साजरा केला जातो. दसऱ्याच्या सणाला म्हणजेच विजयादशमीला हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे. संपूर्ण भारतात हा सण मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. या दिवशी प्रभू रामाने लंकापती रावणाचा वध करून माता सीतेला त्याच्या तावडीतून मुक्त केले होते, असे म्हटले जाते. तेव्हापासून दरवर्षी दसऱ्याच्या दिवशी म्हणजेच विजयादशमीच्या दिवशी लोक रावणाच्या पुतळ्याचे दहन करून वाईटावर चांगल्याचा विजय साजरा करतात.

दरवर्षी आश्विन महिन्यात शुक्ल पक्षाच्या दशमीला दसरा हा सण साजरा केला जातो. पंचांगानुसार, या वर्षी दशमी तिथी 4 ऑक्टोबर 2022 रोजी दुपारी 2:21 पासून सुरू होत आहे. ही तारीख 05 ऑक्टोबर रोजी दुपारी 12 वाजेपर्यंत राहील. त्यामुळे उदयतिथीनुसार 05 ऑक्टोबर रोजी विजयादशमीचा सण साजरा केला जाणार आहे. दसऱ्याच्या दिवशी कुटुंबिय नवीन लग्न झालेल्या जोडप्यांना उखाणा घेण्यास सांगतात आणि तुम्हाला त्यांचा हट्ट पूरवावाचं लागतो. त्यामुळे दसऱ्याच्या दिवशी जुने-पुराने उखाणे न घेता खास दसऱ्याचा उल्लेख असणारे उखाणे घ्या. आम्ही तुमच्यासाठी दसऱ्याला घेण्यात येणारी काही खास उखाणे घेऊन आलो आहोत.

दसऱ्याच्या दिवशी घ्यावयाची खास उखाणे -

वरील उखाणे घेऊन तुम्ही आपल्या परिवाराचा आणि मित्र-मैत्रिणींचा हट्ट पूर्ण करू शकतात. हे खास उखाणे ऐकल्यानंतर तुमचे नातेवाईक तुमची नक्कीच वाह वाह करतील. तुम्हाला हे उखाणे आवडले असतील तर तुम्ही आपल्या इतर मैत्रिणींना ते फॉरवर्ड करू शकतात.