Ganpati Rangoli Simple Design: माघी गणेश चतुर्थीनिमत्त घरासमोर, अंगणात आणि मंडळासमोर काढा 'या' सोप्या बाप्पाच्या रांगोळी डिझाईन्स, Watch Videos

माघी गणेश चतुर्थीनिमित्त तुम्ही तुमच्या घरासमोर, अंगणात आणि मंडळासमोर बाप्पाच्या सोप्या रांगोळी डिझाईन्स काढू शकता. यासाठी तुम्ही खालील व्हिडिओ पाहू शकता.

Ganpati Rangoli Simple Design (PC- You Tube)

Ganpati Rangoli Simple Design: सनातन धर्मात चतुर्थी तिथीला अधिक महत्त्व आहे. प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्ष आणि शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला गणपतीचे व्रत आणि पूजा करण्याची परंपरा आहे. यंदा 26 जानेवारीपासून माघ महिना सुरू झाला आहे. तसेच 24 फेब्रुवारी रोजी संपणार आहे. या महिन्यात लंबोदर संकष्टी चतुर्थी आणि विनायक चतुर्थी (Vinayak Chaturthi) साजरी केली जाईल. चतुर्थीच्या शुभ मुहूर्तावर श्रीगणेशाची आराधना केल्याने शुभ परिणाम प्राप्त होतात आणि जीवनात आनंद मिळतो, अशी धार्मिक श्रद्धा आहे.

पंचांगानुसार, माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथी 12 फेब्रुवारीला संध्याकाळी 5:44 वाजता सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे 13 फेब्रुवारीला दुपारी 2:41 वाजता समाप्त होईल. यंदा विनायक चतुर्थी म्हणजेच माघी गणेश चतुर्थी (Maghi Ganesh Chaturthi 2024)  13 फेब्रुवारी रोजी साजरी करण्यात येईल. माघी गणेश चतुर्थीनिमित्त तुम्ही तुमच्या घरासमोर, अंगणात आणि मंडळासमोर बाप्पाच्या सोप्या रांगोळी डिझाईन्स काढू शकता. यासाठी तुम्ही खालील व्हिडिओ पाहू शकता. (हेही वाचा -Ganapati Photos Free Download For Ganesh Jayanti 2024: माघी गणेश जयंतीनिमित्त 'या' ठिकाणी मोफत डाउनलोड करा गणपतीचे काही खास फोटो)

गणपती रांगोळी डिझाईन्स व्हिडिओ - 

माघी गणेश चतुर्थीला गणपतीचे नामस्मरण करून व्रत सुरू केले जाते. या दिवशी उपवासाच्या वेळी गणपती पूजेनंतर चंद्र पाहावा आणि त्यानंतरचं उपवास सोडावा. या दिवशी विधीनुसार गणपतीची पूजा करून व्रत केल्यास सर्व प्रकारचे संकट दूर होतात.