Gudi Padwa 2023 Mehndi Designs: गुढीपाडव्यानिमित्त आपल्या हातांवर काढा खास मेहंदी डिझाइन्स; Watch Video

तुम्ही हे व्हिडिओ पाहून आपल्या हातावर सुंदर अशी मेहंदी काढ शकता.

Gudi Padwa 2023 Mehndi Designs (PC - You Tube)

Gudi Padwa 2023 Mehndi Designs: हिंदू दिनदर्शिकेनुसार, दरवर्षी चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या प्रतिपदेला, नवीन वर्षाचा उत्सव देशाच्या विविध भागांमध्ये साजरा केला जातो. या दिवशी हिंदू नववर्षाची सुरुवात होते. या दिवशी गुढी उभारून नववर्षाचं स्वागत केलं जात. यंदा 22 मार्च रोजी सर्वत्र गुढी पाडव्याचा सण साजरा करण्यात येणार आहे. महाराष्ट्रात गुढी पाडव्याचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. (हेही वाचा - Gudi Padwa 2023 Rangoli Designs: गुढीपाडव्याला काढता येतील अशा सुंदर आणि हटके रांगोळी डिझाईन, पाहा व्हिडीओ)

या दिवशी महिला अंगणात सुंदर रांगोळी काढून गुढीला नैवैद्य दाखवतात. तसेच नववर्षाच्या स्वागतासाठी घरातील महिला साज-श्रृंगार करतात. या दिवशी महिलांच्या श्रृंगारात भर पडते ती, हातावरील मेहंदीने. त्यामुळे तुम्ही देखील गुढीपाडव्याला खास मेहंदी काढण्याचा विचार करत असाल तर आम्ही तुमच्यासाठी गुढीपाडवा स्पेशल मेहंदी डिझाइन्स घेऊन आलो आहोत. तुम्ही हे व्हिडिओ पाहून आपल्या हातावर सुंदर अशी मेहंदी काढ शकता. (हेही वाचा - Gudi Padwa 2023: गुढीपाडव्यानिमित्त गुढी कशी उभारावी? गुढी उभारण्यासाठी कोणत्या गोष्टी लागतात? आणि त्याचं महत्त्व काय? जाणून घ्या)

Gudi Padwa 2023 Mehndi Designs Videos -

गुढीपाडव्याचा सण महाराष्ट्र, आंध्र प्रदेश आणि गोव्यात मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. या दिवशी स्त्रिया गुढीपाडव्याला भरपूर सजावट करून पूजा करतात. या दिवशी अनेक शुभ कामांची सुरुवात देखील केली जाते.