IPL Auction 2025 Live

Diwali Utane Making At Home : यंदाच्या दिवाळीत घरच्या घरी तयार करा 'सुगंधी उटणे' ; जाणून घ्या सोपी पद्धत ( Watch Video ) 

ज्यामुळे त्वचेवर दुष्परिणाम होण्याची शक्यता ही असते. अशा वेळी त्वचेचं नुकसान टाळण्यासाठी घरच्या घरीच तयार केलेले उटण्यांचा वापर केला तर? आज आपण पाहणार आहोत घरच्या घरी सोप्या पद्धतीने उटणे कसे तयार करता येतील याची कृती. 

Photo Credit : YouTube

दिवाळी हा सगळ्यांच्याच आवडीचा सण.अगदी लहानांपासून ते अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच हा सण प्रिय आहे.दिवाळी(Diwali) म्हटल की रोषणाई, दिव्यांचा लखलखाट, सजावट आणि खमंग फराळ हे सगळेच आले.मात्र याबरोबरच आणखिन एक गोष्ट महत्वाची आहे ते म्हणजे सुगंधी उटणे(Utane).पहाटे उठून अंगाला उटणे लावून अभ्यंगस्नान करण्याची परंपरा फार पूर्वीपासून चालत आलेली आहे.पूर्वीच्या काळी लोक घरीच उटणे (Ubtan)तयार करत असत. पण आता वेळेनुसार बऱ्याच गोष्टींमध्ये बदल होत गेला आणि हल्ली बाजारात वेगवेगळ्या प्रकारचे सुगंधी उटणे ग्राहकांसाठी उपलब्ध आहेत. (Diwali 2020 Kandil Making At Home : घरच्या घरी सोप्या पद्धतीने असा बनवा आकाश कंदील ( Watch Video )

पण बाजारात मिळणाऱ्या या उटण्यांमध्येही बऱ्याचदा काही हानिकारक रसायनांचा समावेश केला जातो. ज्यामुळे त्वचेवर दुष्परिणाम होण्याची शक्यता ही असते. अशा वेळी त्वचेचं नुकसान टाळण्यासाठी घरच्या घरीच तयार केलेले उटण्यांचा वापर केला तर? आज आपण पाहणार आहोत घरच्या घरी सोप्या पद्धतीने उटणे कसे तयार करता येतील याची कृती.

कमीत कमी साहित्यात बनवलेले उटणे

अभ्यंग स्नानासाठी बनवलेले आयुर्वेदिक उटणे

त्वचेचा रंग उजळण्यासाठी तयार केलेले उटणे

सुगंधी व औषधी उटणे

बाजारात तुम्हाला खुप वेगवेगळ्या प्रकारची उटणे मिळतील मात्र ते सगळ्यांच्याच त्वचेला सूट होतील याची खात्री देणे कठीन आहे.अशा वेळी घरच्या घरी उटणे बनवणे हे कधीही फायद्याचे ठरेल. तेव्हा यंदा आपल्या त्वचेची काळजी घ्या आणि सोप्या पद्धतीने घरीच उटणे  तयार करा.