Diwali Festival 2023 Dates: दिवाळीची पहिली आंघोळ, भाऊबीज कधी? पहा यंदा दिवाळीच्या 6 दिवसांच्या सेलिब्रेशनच्या तारखा

त्यामध्ये धनतेरस, पहिली आंघोळ, लक्ष्मीपूजन, दिवाळी पाडवा, भाऊबीज असे विविध सण साजरे केले जातात. या प्रत्येक दिवसाचं एक विशेश महत्त्व देखील आहे.

Diwali | File Image

नवरात्र उत्सवाची सांगता दसरा सणाने झाल्यानंतर हिंदू धर्मियांना वेध लागतात ते म्हणजे दिवाळी सणाचे (Diwali 2023 Festival). दीपोत्सवाचे (Deepotsav) हे पर्व देशभर मोठ्या जल्लोषात साजरं केलं जातं. नवीन कपड्यांची खरेदी, फराळ, भेटवस्तूंची रेलचेल असते. मग यंदा दिवाळीचं हे मंगलमय पर्व कधी सुरू होणार याची उत्सुकता तुमच्याही मनात असेल. मग पहा यंदा दिवाळीच्या या पर्वात कोणता सण कधी आहे? दिवाळी हा एका दिवसाचा सोहळा नसतो. महाराष्ट्रात दिवाळी वसूबारस (Vasubaras) पासून सुरू होते आणि भाऊबीजेपर्यंत (Bhaubeej) साजरी केली जाते. त्यामध्ये धनतेरस, पहिली आंघोळ, लक्ष्मीपूजन, नरक चतुर्दशी, दिवाळी पाडवा, भाऊबीज असे विविध सण साजरे केले जातात. या प्रत्येक दिवसाचं एक विशेश महत्त्व देखील आहे.

दिवाळी 2023 मधील सणांच्या तारखा

वसू बारस (Vasubaras 2023 Date) 

हिंदू धर्मात सणांमध्ये सेलिब्रेशन सोबत निसर्गाला, पशु प्राण्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याची भावना रूजवली जाते. दिवाळी सणामधील पहिला दिवस वसू बारस देखील त्याच उद्देशाने साजरा केला जाते. शेतीप्रधान भारत देशामध्ये घरात असलेले पशू धन प्रामुख्याने गोमाता आणि वारसं यांची वसूबारसेला तिन्ही सांजेला पुजा केली जाते. यंदा वसू बारस 9 नोव्हेंबर दिवशी आहे.

धनत्रयोदशी (Dhantrayodashi 2023 Date)

हिंदू धर्मियांच्या पवित्र वेदांमध्ये आयुर्वेदाचाही समावेश आहे. या आयुर्वेदाची देवता धन्वंतरी याची पूजा धनतेरस अर्थात धनत्रयोदशी दिवशी केली जाते. धन्वंतरी पूजनासोबतच या दिवशी धनसमृद्धी लाभावी म्हणून कुबेराची पूजा केली जाते. या निमित्ताने सोनं खरेदी केलं जाऊ शकतं. यंदा धनत्रयोदशी 10 नोव्हेंबर दिवशी आहे. Ayurveda Day 2023: यावर्षी जगभरातील सुमारे 100 देशांमध्ये साजरा होणार 'आयुर्वेद दिन'; जाणून घ्या या दिवसाचे महत्व.

नरक चतुर्दशी (Narak Chaturdashi 2023 Date)

महाराष्ट्रात दिवाळीतील मोठा महत्त्वाचा दिवस म्हणजे नरक चतुर्दशीचा. या दिवशी नरकासूराचा वध करण्यात आला होता. त्यामुळे पहाटे सूर्योदयापूर्वी उठून स्नान करून प्रतिकात्मक नरकासूराचा वध करून हा दिवस साजरा केला जातो. हीच दिवाळीतील पहिली आंघोळ म्हणून देखील ओळखली जाते. 12 नोव्हेंबरला नरक चतुर्दशी म्हणजे महाराष्ट्रात दिवाळी आहे.

लक्ष्मीपूजन (Lakshmi Puja 2023 Date)

दिवाळीत लक्ष्मी पूजनाला विशेष महत्त्व आहे. घरात आर्थिक सुबकता राहावी म्हणून लक्ष्मी पूजन केले जाते. 12 नोव्हेंबरच्या संध्याकाळी यंदा लक्ष्मीपूजन केले जाणार आहे.

दिवाळी पाडवा (Diwali Padwa 2023 Date)

साडेतीन मुहूर्तांपैकी अर्धा दिवस म्हणजे दिवाळी पाडवा. यादिवशी पत्नी पतीचं औक्षण करते. दिवाळी पाडवा यंदा 14 नोव्हेंबरला साजरा केला जाईल. बलिप्रतिपदा म्हणूनही हा दिवस साजरा केला जातो.

भाऊबीज (Bhaubeej 2023 Date)

दिवाळी सणाची सांगता बहीण-भावाच्या गोड नात्याच्या सेलिब्रेशनने होतो. भाऊबीज यंदा 15 नोव्हेंबरला आहे.

दिवाळीचे हे 6 दिवस मोठ्या आनंदात साजरे केले जातात. एकमेकांच्या घरी जाऊन फराळावर ताव मारणं, भेटवस्तू देणं, दिवाळी नाईट्स साजरं करणं हे सारं जल्लोषात केले जाते. दिवाळीच्या निमित्ताने घरात आकर्षक रोषणाई केली जाते. दारात दिव्यांची आरास केली जाते.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif