Diwali 2020 Diet Tips: दिवाळीत चकली, लाडू यांसारख्या फराळामध्ये यंदा करा 'हे' महत्त्वाचे बदल आणि घ्या आपल्या डाएटची काळजी

तुम्हाला तुमचा डाएट न मोडता मनसोक्त फराळ खाता आला तर! कल्पना थोडी विचित्र वाटत असली तरी असे होऊ शकते. दिवाळीत बनवले जाणारे गोड आणि तळणीचे तिखट फराळात काही ठराविक बदल केले तर तुमचा डाएट मोडला जाणार नाही आणि तुमचे वजनही नियंत्रणात राहू शकते.

Diwali 2020 Diet Tips: दिवाळीत चकली, लाडू यांसारख्या फराळामध्ये यंदा करा 'हे' महत्त्वाचे बदल आणि घ्या आपल्या डाएटची काळजी
Diwali Diet Faral (Photo Credit: Wikimedia Commons)

Diwali 2020 Diet Faral: दिवाळी (Diwali 2020) म्हटलं की सगळीकडे दिव्यांची रोषणाई, आकाशकंदिल, रांगोळी, फटाके आणि मुख्य वर्षातून खास केला जाणारा फराळ हा सर्वांनाच हवाहवासा वाटतो. दिवाळी आता काही दिवसांवरच आली असून एव्हाना घराची साफसफाई मोहिम जोरदार सुरु झाली असून फराळ बनवायला सुरुवात झाली असेल. गृहिणींमध्ये फराळ बनविण्यासाठी जितका उत्साह असतो त्याहून अधिक तो फराळ (Faral) कधी एकदा खातोय याची घाई सगळ्यांना लागली असते. घरातले बच्चे कंपनीपासून सर्वच जण फराळाची आतुरतेने वाट पाहत असतात. यावेळी अनेकांचा डाएट (Diet) देखील मोडतो. दिवाळी आहे असं म्हणून काही जण डाएट मोडतात ज्याचा परिणाम नंतर वजनकाटा पाहिल्यावर दिसतो.

अशा वेळी तुम्हाला तुमचा डाएट न मोडता मनसोक्त फराळ (Diet Faral Tips) खाता आला तर! कल्पना थोडी विचित्र वाटत असली तरी असे होऊ शकते. दिवाळीत बनवले जाणारे गोड आणि तळणीचे तिखट फराळात काही ठराविक बदल केले तर तुमचा डाएट मोडला जाणार नाही आणि तुमचे वजनही नियंत्रणात राहू शकते. हेदेखील वाचा- Narak Chaturdashi 2020 Importance, Puja Vidhi And Muhurt: नरक चतुर्दशी दिवशी का केले जाते अभ्यंग स्नान, जाणून घ्या महत्व, मुहूर्त आणि पूजा विधी

दिवाळीचा फराळ बनवताना महत्त्वाच्या डाएट टिप्स:

1. लाडू बनवताना त्यात साखरेऐवजी गूळ, खजूर किंवा फळांच्या गराचा वापर केल्यास शरीरातील फॅट्स वाढत नाही. तसेच गूळ, खजूर आणि फळांचा गर हा पौष्टिक आहार असल्यामुळे आपले वजन नियंत्रित राहते आणि शरीरावर त्याचा विपरित परिणामही होत नाही.

2. करंजी, चकली तेलात तळण्याऐवजी त्या बेक कराव्यात. यामुळे त्याच्या चवीत फारसा फरक पडत नाही. तसेच तेलाचं सेवन कमी झाल्यामुळे आपले कोलेस्टेरॉल देखील वाढत नाही.

3. शंकरपाळ्यांमध्ये मैद्यासोबत थोडा रवा घातला तर शंकरपाळ्या खुसखुशीत होतात. तसेच त्या शरीरासाठी पौष्टिकही असतात.

दिवाळीत फराळ खाल्ला नाही तर तुमची दिवाळी पूर्णच होऊ शकणार नाही. मात्र ही खाताना या ठराविक गोष्टीत बदल केल्यास तुमचा डाएट कायम राहिल आणि तुम्ही निर्धास्तपणे फराळावर ताव मारू शकता.

(सूचना: वरील मजकूर केवळ प्राप्त माहितीवर आधारित आहे. यास वैद्यकीय सल्ला समजू नये. घरगुती/नैसर्गिक उपचार घेण्यापूर्वी डॉक्टरांच्या सल्ला घेणे आवश्यक आहे. लेटेस्टली मराठी त्या मजकूराची पुष्टी करत नाही.)

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Advertisement


Advertisement
Advertisement
Share Us
Advertisement