Dhanteras 2024 Shopping Do's and Don'ts: जाणून घ्या धनत्रयोदशीला कोणत्या गोष्टींची करावी खरेदी व कोणत्या गोष्टी टाळाव्या

मुख्यत्वे संध्याकाळी दुकानांमध्ये ही पूजा होते. हिशेबाच्या नव्या वह्यांचा वापर या दिवसापासून सुरू करण्याचा प्रघात आहे.

Dhanteras (File Photo)

Dhanteras 2024 Shopping Do's and Don'ts: सध्या देशभरात सणासुदीचा हंगाम सुरू आहे. आजच्या वसुबारसपासून दिवाळीच्या उत्सवाला सुरुवात झाली आहे. देशात 29 ऑक्टोबर रोजी धनत्रयोदशीचा (Dhantrayodashi 2024) सण साजरा केला जाणार आहे. धनत्रयोदशीच्या दिवशी भगवान कुबेर, धन्वंतरी आणि लक्ष्मीमातेची पूजा केली जाते. मुख्यत्वे संध्याकाळी दुकानांमध्ये ही पूजा होते. हिशेबाच्या नव्या वह्यांचा वापर या दिवसापासून सुरू करण्याचा प्रघात आहे. धनत्रयोदशीदिवशी काही गोष्टींच्या खरेदीला विशेष महत्व आहे. धनत्रयोदशीच्या दिवशी खास करून सोन्या-चांदीच्या दागिन्यांची तसेच भांड्यांची खरेदी केली जाते.

धनत्रयोदशीच्या दिवशी अशा काही गोष्टी आहेत ज्यांची खरेदी करणे खूप शुभ मानले जाते. यामध्ये सोने-चांदी खरेदी करणे अधिक शुभ मानले जाते, परंतु प्रत्येकजणच ते खरेदी करू शकत नाही. म्हणून धनत्रयोदशीच्या दिवशी अशा काही गोष्टी आहेत, ज्या सर्वसामान्य लोक खरेदी करू शकतील.

या गोष्टींची करा खरेदी-

तुम्ही झाडू, मीठ, तांब्या-पितळेची भांडी, खेळणी, नवीन कपडे, धणे, लक्ष्मी मूर्ती, लक्ष्मी-गणेश मूर्ती, धन्वंतरीची मूर्ती, गोमती चक्र अशा गोष्टी खरेदी करू शकता. या सर्व वस्तू खरेदी केल्याने माता लक्ष्मी प्रसन्न होते व यामुळे घरात कधीही धन आणि धान्याची कमतरता भासत नाही, असे मानले जाते.

तसेच या सर्व गोष्टी देवी लक्ष्मीला अधिक प्रिय असल्याने, त्यांची खरेदी केल्याने कुटुंबात आनंद, समृद्धी आणि सकारात्मक ऊर्जा येते. याशिवाय, या गोष्टींची खरेदी करणे तुमच्यासाठी आर्थिकदृष्ट्याही फायदेशीर ठरू शकेल. (हेही वाचा: Diwali 2024 Date, Laxmi Puja Muhurat: दिवाळी, लक्ष्मीपूजन तारीख, मुहूर्त आणि मुहूर्त व्यापार कधी? घ्या जाणून)

चुकूनही या वस्तू खरेदी करा नका-

धनत्रयोदशीच्या दिवशी काही वस्तू खरेदी करणे तितकेच अशुभ असते. धनत्रयोदशीला काचेची भांडी अजिबात खरेदी करू नयेत. याशिवाय स्टील आणि प्लॅस्टिकच्या वस्तू अशुभ मानल्या गेल्या आहेत. ॲल्युमिनियम खरेदी करणे तुम्हाला अडचणीत आणू शकते, त्यामुळे तुम्ही ॲल्युमिनियम खरेदी करणे टाळावे. याशिवाय लोखंड शनिदेवाशी संबंधित असल्याने लोखंड खरेदी करणे टाळावे. काळ्या रंगाची कोणतीही वस्तू घरी आणू नका, ती अशुभ मानली जाते. तीक्ष्ण वस्तू खरेदी करणे देखील टाळा. असे मानले जाते की यामुळे घरात अशांतता राहते.

(टीप- या लेखात दिलेली माहिती इंटरनेटआधारीत आहे. लेटेस्टली मराठी याची पुष्टी करत नाही.)