Deepawali & Vastu Tips: कोणत्या दिशेला लक्ष्मी-गणेशाची स्थापना करून पूजा केल्याने होणार लाभ, जाणून घ्या, संपूर्ण माहिती

देवी लक्ष्मीची पूजा कोणत्या दिशेला करावी म्हणजे ती प्रसन्न होते, तसेच व्यक्तीची आर्थिक स्थिती सुधारते आणि त्यांची गरिबी दूर होते. ज्योतिषी श्री भागवत जी महाराज येथे सांगत आहेत की, या वर्षी लक्ष्मी आणि गणेशजींची मूर्ती कोणत्या दिशेला असावी व कोणत्या दिशेला बसून पूजा करावी. पाच दिवसांच्या दिवाळी पूजेचा केंद्रबिंदू म्हणजे देवी लक्ष्मी असते आणि लक्ष्मीपुजन असते. कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील अमावास्येला शुभ मुहूर्तावर पूजा करण्याचा विधी आहे.

Deepawali & Vastu Tips

Deepawali & Vastu Tips: लक्ष्मीपूजनाचे दिवस जवळ आले आहेत. देवी लक्ष्मीची पूजा कोणत्या दिशेला करावी म्हणजे ती प्रसन्न होते, तसेच व्यक्तीची आर्थिक स्थिती सुधारते आणि त्यांची गरिबी दूर होते. ज्योतिषी श्री भागवत जी महाराज येथे सांगत आहेत की, या वर्षी लक्ष्मी आणि गणेशजींची मूर्ती कोणत्या दिशेला असावी व कोणत्या दिशेला बसून पूजा करावी. पाच दिवसांच्या दिवाळी पूजेचा केंद्रबिंदू म्हणजे देवी लक्ष्मी असते आणि लक्ष्मीपुजन असते. कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील अमावास्येला शुभ मुहूर्तावर पूजा करण्याचा विधी आहे. पूजेच्या विधींमध्ये सर्वप्रथम लक्ष्मी-गणेशाचे पद कोणत्या दिशेला ठेवावे आणि पद कसे सजवावे हे जाणून घेणे आवश्यक आहे. आचार्य भागवत जी सांगतात की, देवी लक्ष्मीचे पद उत्तर किंवा पूर्व दिशेला ठेवणे आणि व्यक्ती पश्चिम दिशेला असणे शुभ मानले जाते. मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यापूर्वी पाट स्वच्छ करा. त्यावर नवीन लाल कापड पसरवा. या मंत्राचा जप करताना कापडावर हळद लावून स्वस्तिक बनवा आणि मूर्तीची स्थापना करा. ‘ओम श्रीं ह्रीं श्रीं महालक्ष्मी नमः’ या मंत्राचा जप करा. हे देखील वाचा: Guidelines For Use Of Firecrackers: मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी! रात्री 10 वाजेपर्यंत फटाके फोडता येणार; फटाक्यांच्या वापरासाठी नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी

लक्ष्मी-गणेशजींची मूर्ती खरेदी करताना काही गोष्टी लक्षात ठेवा. सर्व प्रथम, मूर्ती खंडित किंवा विकृत होऊ नये, तसेच तुटलेली मूर्ती जोडू नये. मूर्ती सोन्याची, चांदीची किंवा मातीची असावी. देवी लक्ष्मी कमळावर विराजमान असावी आणि तिचा एक हात आशीर्वादाच्या मुद्रेत असावा. या दिवशी देवी लक्ष्मीसह गणेशाची पूजा करण्याची परंपरा आहे. श्रीगणेशाची सोंड डावीकडे वाकलेली असावी. मूर्तीची प्रतिष्ठापना करताना गणेशजींना डावीकडे आणि लक्ष्मीला उजवीकडे ठेवा. मूर्तीभोवती चांगले दिवे किंवा रंगीबेरंगी दिवे लावा, जेणेकरून सुंदर  वाटेल.

 मूर्तीची प्रतिष्ठापना करताना लक्ष्मी आणि गणेशाची स्तुती अवश्य करा. शक्य असल्यास कीर्तन आणि भजन सर्व वेळ वाजवावे.

लक्ष्मी पूजनाचे नियम

* लक्ष्मीपूजनाच्या वेळी देवी लक्ष्मीचे ध्यान करा आणि तिचा आमंत्रण मंत्र वाचा.

* लक्ष्मीला प्रथम गंगाजलाने आणि नंतर पंचामृताने स्नान घालावे.

* लक्ष्मीला रोळी आणि अक्षतासह टिळक करा.

*पूजेदरम्यान लक्ष्मी मंत्रांचा जप करावा.

*पूजेच्या शेवटी लक्ष्मीची आरती करावी.

*पूजेनंतर पूजा साहित्य आणि प्रसाद लगेच उचलू नये.

* दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी मूर्ती आणि पूजेचे साहित्य काढून टाका.