Datta Jayanti 2020 Messages in Marathi: दत्त जयंती निमित्त मराठी शुभेच्छा संदेश, Wishes, WhatsApp, Facebook वर शेअर करुन दिवस करा मंगलमय!
दत्त जयंती निमित्त शुभेच्छा देण्यासाठी सोशल मीडिया माध्यमातून शेअर करा मराठी शुभेच्छा संदेश, Messages, Wishes, Images आणि शुभेच्छापत्रं...
Datta Jayanti 2020 Messages: मार्गशीर्ष शुद्ध पौर्णिमा ही दत्तजयंती म्हणून साजरी करतात. यंदा मंगळवार, 29 डिसेंबर रोजी दत्तजयंती साजरी होणार आहे. दत्त हा विष्णुचा सहावा अवतार मानला जातो. दत्तजयंती निमित्त गाणगापूर, नरसोबाची वाडी, औदुंबर आदी दत्ताची स्थाने असलेल्या ठिकाणी मोठा उत्सव असतो. तसंच लहान मोठी दत्तमंदिरात या दिवशी विद्युत रोषणाई, फुलांची सजावट, धार्मिक कार्यक्रम यांची रेलचेल असते. पालखी सोहळा साजरा केला जातो. मात्र यंदा कोरोना व्हायरस संकटाच्या पार्श्वभूमीवर गर्दी टाळण्यासाठी अनेक मोठ्या मंदिरात भाविकांना प्रवेश दिला जाणार नाही. तसंच इतर ठिकाणी देखील अगदी साधेपणाने सोहळा साजरा केला जाईल. मात्र डिजिटल युगात तुम्ही सोशल मीडिया माध्यमातून शुभेचछा संदेश पाठवून दत्त जयंती साजरी करु शकता. फेसबुक (Facebook), व्हॉट्सअॅप (WhatsApp), ट्विटर (Twitter), इंस्टाग्राम (Instagram) यांसारख्या सोशल मीडिया माध्यमातून मराठी शुभेच्छा संदेश, Wishes, Messages,Images आणि शुभेच्छापत्रं शेअर करुन तुम्ही दत्त जयंतीचा उत्साह कायम ठेवू शकता.
दत्त जन्माच्या वेगवेगळ्या कथा सांगतिल्या जातात. तसंच दत्त नाव कसे पडले याचीही अख्यायिका आहे. ऋषी अत्री आणि पत्नी अनुसया यांच्या घरी आलेले तीन पाहुणे खुद्द ब्रम्हा, विष्णू, महेश होते, हे अत्री ऋषींनी ओळखले. आणि त्यांची नावे चंद्र, दत्त व दुर्वास अशी ठेवली. त्यातला दत्त हा विष्णूचा अवतार होता. पुढे चंद्र चंद्रलोकी निघून गेला. दुर्वास तपश्चर्या करण्यासाठी जंगलात निघून गेला आणि दत्त या तिघांचे रुप म्हणून राहीला. त्याला तीन शिरे आणि सहा हात असल्याने दत्तात्रेय असे नाव पडले. तर देवाच्या कृपेने झाला म्हणून दत्त आणि अत्रि ऋषींचा मुलगा म्हणून अत्रेय. त्यामुळे दत्त आणि अत्रेय मिळून दत्तात्रेय नाव पडेल अशी दुसरी कथा सांगितली जाते. (Datta Jayanti 2020 ची तिथी वेळ जाणून घ्या)
दत्त जयंतीच्या शुभेच्छा!
गुरुर ब्रह्मा, गुरुर विष्णु, गुरुर देवो महेश्वर:
गुरुर साक्षात परम ब्रह्म
तस्मै श्री गुरुवे नम:
श्री दत्त जयंती निमित्त आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा!
चरण शुभंकर फिरता तुमचे, मंदिर बनले उभ्या घराचे
घुमटा मधुनी हृदयपाखरु स्वानंदे फिरले
मला ते दत्तगुरु दिसले
श्री दत्त जयंतीच्या भक्तीमय शुभेच्छा!
धावत येसी भक्तांसाठी, ब्रम्हा, विष्णू, महेश्वरा!!
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा!!
दत्त जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!
ज्याच्या मनी गुरु विचार
तो नसे कधी लाचार|
ज्याच्या अंगी गुरु भक्ती
त्याला नाही कशाची भीती|
ज्याच्या हृदयात गुरु मुर्ती
त्याची होई जगभरात किर्ती|
जो करेल गुरु ची पूजा
त्याच्या आयुष्यातील दु:ख होईल वजा|
श्री दत्त जयंतीच्या मन:पूर्वक शुभेच्छा!
!!दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा!!
श्री दत्त जयंतीच्या मंगलमय शुभेच्छा!
दत्त जयंती निमित्त अनेक भाविक दत्त तिर्थक्षेत्रांना भेटी देतात. दत्त मंदिरं भाविकांनी फुलतात. मात्र यंदा हे सर्व टाळणेच योग्य ठरेल. तर काही भाविक गुरुचरित्राचे पारायण करण्यात रमतात. यंदाच्या दत्त जयंती निमित्त मंदिरात गर्दी करण्याऐवजी घरात राहून नामस्मरण करणे उचित असेल. मराठी लेस्टेली कडून दत्त जयंतीच्या मन:पूर्वक शुभेच्छा!