Dahi Handi Wishes in Marathi: दहीहंडीच्या शुभेच्छा WhatsApp Status, Facebook Messages द्वारा देत वाढवा गोविंदांचा उत्साह

आजच्या काळात दहीहंडी हा केवळ धार्मिक सण न राहता एक सामाजिक आणि क्रीडात्मक उत्सव बनला आहे. मग यामध्ये सहभागी गोविंदाचा उत्साह वाढवण्यासाठी नक्की शेअर करा ही मराठमोळी मेसेजेस, व्हॉट्सॅप स्टेटस.

Dahi Handi Wishes in Marathi: दहीहंडीच्या शुभेच्छा WhatsApp Status, Facebook Messages द्वारा देत वाढवा गोविंदांचा उत्साह
Dahi handi Messages

श्रावण महिन्यातील वद्य अष्टमी अर्थात श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या (Krishna Janmashtami) दुसऱ्या दिवशी संपूर्ण महाराष्ट्रात, विशेषतः मुंबई, पुणे, ठाणे यांसारख्या शहरांत मोठ्या उत्साहात साजरा होणारा सण म्हणजे दहीहंडी (Dahi Handi). या दिवशी रस्त्यांवर मानवी मनोऱ्यांची स्पर्धा पाहायला मिळते.आजच्या काळात दहीहंडी हा केवळ धार्मिक सण न राहता एक सामाजिक आणि क्रीडात्मक उत्सव बनला आहे. मग तुमच्या नात्यातील आप्तेष्टांना, मित्रमंडळींना या दहीहंडीच्या शुभेच्छा देत त्यांचा उत्साह वाढवा. WhatsApp Status, Facebook Messages, Quotes, Wishes, Images च्या माध्यमातून दहीहंडीच्या मराठमोळ्या शुभेच्छा देऊ शकता.

बाळकृष्णाला दही, दूध, लोणी अतिशय प्रिय होते. गोकुळातील गोपिका आपले दही-लोणी उंच मडक्यांमध्ये (हंड्यांमध्ये) टांगून ठेवत असत, जेणेकरून बाळकृष्ण त्यापर्यंत पोहोचू नये. परंतु खोडकर कान्हा आपल्या सवंगड्यांसह मानवी मनोरा रचून त्या हंडीपर्यंत पोहोचायचा आणि दही-लोणी चोरून खायचा. याच बालकृष्णलीलेचे प्रतीक म्हणून आजही दहीहंडी फोडण्याची परंपरा जपली जाते.

दहीहंडीच्या शुभेच्छा

Dahi Handi Festival Marathi Greeting
Happy Dahi Handi

गोविंदांच्या त्या जल्लोषात, दडलेली असते एकता,

तशीच एकजूट राहो सदा, तुझ्या प्रत्येक नात्यात, आपुलकीत, ममता.

दहीहंडीच्या शुभेच्छा!

 

Dahi Handi Festival Marathi Greeting
Happy Dahi Handi

पडलास तरी हरकत नाही, पुन्हा उठून चढायचं असतं,

गोविंदा तेच शिकवतो - मैदान कधीच सोडायचं नसतं.

हॅप्पी दहीहंडी!

Dahi Handi Festival Marathi Greeting
Happy Dahi Handi

हंडी उंच असो कितीही, गोविंदा घाबरत नाही,

तूही अशीच उंच स्वप्नं बघ, अडथळ्यांची भीती नाही.

Dahi Handi Festival Marathi Greeting
Happy Dahi Handi

हंडीचा खेळ शिकवतो, धीर सोडायचा नसतो,

शेवटचा प्रयत्नच अनेकदा, यशाचा मार्ग असतो.

दहीहंडीच्या हार्दिक शुभेच्छा!

दहीहंडी हा सण केवळ धार्मिक श्रद्धेचे प्रतीक नसून तो एकतेचा, धाडसाचा आणि सामूहिक उत्साहाचा जिवंत आविष्कार आहे. परंपरा जपत असतानाच सहभागींची सुरक्षितता जपणे हीच खरी काळाची गरज आहे.

उंच थर लावताना अनेकदा गोविंदा पडून गंभीर जखमी होतात. यामुळे न्यायालयाने आणि सरकारने हंडीच्या उंचीवर तसेच सहभागी होणाऱ्या वयोगटावर (विशेषतः अल्पवयीन मुलांच्या सहभागावर) नियम घालून दिले आहेत. सुरक्षा जाळी, हेल्मेट आणि वैद्यकीय पथकांची उपस्थिती बंधनकारक करण्यात आली आहे.

(The above story first appeared on LatestLY on Sep 05, 2026 08:00 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).