Dahi Handi Quotes In Marathi: दहिहंडीच्या Quotes, GIF Greetings, WhatsApp Wishes आणि Photo SMS च्या माध्यमातून द्या खास शुभेच्छा

दरवर्षी कृष्ण जन्माष्टमीच्या एक दिवसानंतर दहीहंडी उत्सव साजरा केला जातो. यंदा हा सण मंगळवार 27 ऑगस्ट रोजी आहे, दरम्यान, या खास प्रसंगी तुम्ही प्रियजनांना खास शुभेच्छा संदेश पाठवू शकता. आम्ही काही हटके शुभेच्छा संदेश घेऊन आलो आहोत.

Dahi Handi 2024 Messages

Dahi Handi Quotes In Marathi: भगवान कृष्णाचा जन्म हा भारतातील सर्वात लोकप्रिय सणांपैकी एक आहे. भगवान विष्णूचा आठवा अवतार मानल्या जाणाऱ्या कृष्णाची देशभरात पूजा केली जाते. भगवान श्रीकृष्णाची जन्मभूमी मानली जाणारी मथुरा आणि वृंदावनसारखी ठिकाणे या उत्सवाने न्हाऊन निघता . जन्माष्टमीनंतर एक दिवस दहीहंडी साजरी केली जाते. दहीहंडीचा सण दरवर्षी देशभरात साजरा केला जातो. ही शुभ परंपरा विशेषतः महाराष्ट्र आणि गोव्यात मोठ्या प्रमाणावर साजरी केली जाते. हा सण गोपालकाला किंवा उत्त्सवम या नावानेही ओळखला जातो, हा हिंदू सण कृष्ण जन्माष्टमी किंवा गोकुळाष्टमीच्या एका दिवसानंतर येतो, जो भगवान कृष्णाच्या बाल क्रिडांचे प्रतीक मानले जाते. दरवर्षी कृष्ण जन्माष्टमीच्या एक दिवसानंतर दहीहंडी उत्सव साजरा केला जातो. यंदा हा सण मंगळवार 27 ऑगस्ट रोजी आहे, दरम्यान, या खास प्रसंगी तुम्ही प्रियजनांना खास शुभेच्छा संदेश पाठवू शकता. आम्ही काही हटके शुभेच्छा संदेश घेऊन आलो आहोत.

 दहिहंडीच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून द्या खास शुभेच्छा 

Dahi Handi Quotes In Marathi

Dahi Handi Quotes In Marathi

Dahi Handi Quotes In Marathi

Dahi Handi Quotes In Marathi

Dahi Handi Quotes In Marathi

दहीहंडीचा सण भगवान श्रीकृष्णाच्या बालपणाची आठवण करून देतो. बाल कृष्ण खूप खोडकर होते, त्यांना दही आणि लोणी खूप आवडत होते. कृष्ण आणि त्यांचे मित्र शेजारच्या घरातून दही-लोणी चोरून खात. गावातील स्त्रिया भगवान श्रीकृष्ण आणि त्याच्या टोळीपासून आपले संरक्षण करण्यासाठी छतावर दही आणि लोणीची भांडी लटकवू लागले. मात्र, कृष्णा आणि त्याच्या मित्रांनी चतुराईने तोडगा काढला. त्यांनी भांडीपर्यंत पोहोचण्यासाठी मानवी पिरॅमिड तयार केले. दहीहंडी उत्सव आपल्याला बालगोपालांच्या या खेळकर बालपणाची आठवण करून देतो.