Dahi Handi 2021 Wishes in Marathi: दहीहंडी निमित्त मराठी Messages, Greetings, Images आणि GIF's शेअर करुन साजरा करा गोपालकाला!
दहीहंडी निमित्त मराठी शुभेच्छा संदेश, Wishes, Messages, Greetings, Images सोशल मीडियाच्या फेसबुक (Facebook), ट्विटर (Twitter), इंस्टाग्राम (Instagram), व्हॉट्सअॅप (WhatsApp) वर शेअर करुन गोपालकाल्याचा सण साजरा करा.
Dahi Handi 2021 Marathi Wishes: श्रावण कृष्ण अष्टमीला मध्यरात्री श्रीकृष्णाचा जन्म झाला. म्हणून ती 'कृष्णाष्टमी', 'गोकुळाष्टमी' किंवा 'जन्माष्टमी' म्हणून ओखळली जाते. जन्माष्टमीनंतर दुसऱ्या दिवशी दहीहंडीचा सण साजरा केला जातो. श्रीकृष्णाच्या खोड्यांची आठवण करुन देणारा दहीहंडीचा उत्सव सर्वत्र मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. परंतु, यंदा कोरोना संकटामुळे या सणाच्या उत्साहावर पाणी फिरले आहे. मात्र दहीहंडी निमित्त मराठी शुभेच्छा संदेश, Wishes, Messages, Greetings, Images, GIF's सोशल मीडियाच्या फेसबुक (Facebook), ट्विटर (Twitter), इंस्टाग्राम (Instagram), व्हॉट्सअॅप (WhatsApp) वर शेअर करुन गोपालकाल्याचा सण साजरा करा.
दहीहंडी निमित्त रस्तोरस्ती दहीहंड्या टांगल्या जातात. 'गोविंदा आला रे आला' असं म्हणतं मुलं घोळक्याने नाचत गात दहीहंडी फोडतात. त्या फुटलेल्या हंड्याचे तुकडे लोक शुभ म्हणून घरी आणतात. आजकाल दहीहंडीचा उत्सवाला मोठे स्वरुप प्राप्त झाले आहे. उंचच उंच दहीहंड्या, नाच-गाण्यांचे कार्यक्रम, सेलिब्रेटींची हजेरी, भरगोस बक्षिस अशा स्वरुपात हा कार्यक्रम साजरा केला जातो. गेल्या काही वर्षांपासून मुलांची मक्तेदारी असलेल्या या कार्यक्रमात मुलीही उत्साहाने सहभागी होऊ लागल्या आहेत. (Lord Krishna Quotes in Marathi: श्रीकृष्णाने भगवतगीतेत केलेले 'हे' उपदेश सांगतात जीवनाचे सार!)
दहीहंडीच्या शुभेच्छा!
थराला या!
नाहीतर,
धरायला या!!
आपला समजून,
गोविंदाला या!!!
दहिकालाच्या खूप खूप शुभेच्छा!
लढा देऊया सामर्थ्याचा..
घरीच करुया उत्सव साजरा
राधेकृष्णाच्या जयघोषाचा...
दहीहंडीच्या भक्तीमय शुभेच्छा!
यंदाही घरुनच करु
श्रीकृष्णाला नमस्कार
दहीहंडीच्या शुभेच्छा
ऑनलाईन देऊन करु
गर्दीला नकार!
दहीहंडीच्या हार्दिक शुभेच्छा!
माखनचोर चित्तचोर
गोकुळातील नंदकिशोर
दह्या दुधाची करतो चोरी
दहीहंडीला येतो जोर
दहीकाल्याच्या मन:पूर्वक शुभेच्छा!
दह्यात साखर आणि साखरेत भात
दही हंडी उभी करूया,
देऊया एकमेकांना साथ,
फोडूया हंडी लावूनच उंच थर,
जोशात करूया दही हंडीचा थाट…
दहिकालाच्या हार्दिक शुभेच्छा!!
GIF's
मथुरेचा राजा कंस याचे गर्वहरण करुन वध करण्यासाठी कृष्णाने देवकीपोटी जन्म घेतला. मात्र जन्म झाल्यावर कंस मारुन टाकेल या भीतीने वडील वसुदेव यांनी मुसळधार पावसात रातोरात त्याल गोकुळात पोहचवले. त्यामुळे कृष्णाचे बालपण गोकुळात गेले. आपल्या बाललीला आणि खोड्या यांनी श्रीकृष्णाने सर्वांना अक्षरश: वेड लावले. पुढे राक्षसांचा वध, कंसवध, कालिया नागाला शरण आणणे असे पराक्रम गाजवले. द्वारकेला राज्य स्थापन केले. गीतेच्या रुपात उपदेश करताना हिंदूना 'भगवतगीता' हा धर्मग्रंथ दिला.
दरम्यान, कोणताही सण साजरा करताना त्यामागील मूळ उद्देश लोप पावणार नाही, याची काळजी घेणे गरजेचे आहे. कारण हे सण अनेक संदेश, शिकवण देत असतात. त्यामुळे सणांची परंपरा अर्थासह पुढच्या पीढीला समजण्यासाठी त्यात फेरफार होता कामा नये. तुम्हा सर्वांना दहीहंडीच्या शुभेच्छा!