Dahi Handi 2020 Messages: दहीहंडी निमित्त मराठमोळे शुभेच्छा संदेश, Wishes, HD Images च्या माध्यमातून Facebook, Whatsapp वर शेअर करुन साजरा करा गोपाळकाला!
सोशल मीडियाच्या फेसबुक, व्हॉट्सअॅप, इंस्टाग्राम, ट्विटर वरुन दहीहंडीच्या शुभेच्छा देण्यासाठी खास मराठमोठे संदेश, शुभेच्छापत्रं, Wishes, Messages, HD Images...
Dahi Handi 2020 Marathi Messages: श्रीकृष्णाचा जन्मोत्सव हा संपूर्ण भारतासाठी आनंदाचे पर्व आहे. श्रावण वद्य अष्टमी म्हणजे गोकुळाष्टमी किंवा कृष्णाष्टमी. या दिवशी मध्यरात्री श्रीकृष्णाचा जन्म झाला. कृष्णाचा जन्मोत्सव संपूर्ण भारतभर साजरा केला जातो. यंदा मंगळवार 11 ऑगस्ट रोजी श्रीकृष्ण जन्माष्टमीचा सण आहे. कृष्णाचा जन्मोत्सव संपूर्ण भारतभर साजरा केला जातो. जन्माष्टमीच्या दुसऱ्या दिवशी गोपालकाला म्हणजेच दहीहंडी चा उत्सव साजरा होतो. श्रीकृष्णाच्या माखनचोरीची आठवण म्हणून दहीहंडी फोडण्याचा कार्यक्रम साजरा केला जातो. मुंबईत तर दहीहंडीचा विशेष उत्साह पाहायला मिळतो. रस्तोरस्ती उंचच उंच दहीहंड्या टांगलेल्या असतात. गोविंदा पथक या हंड्या फोडण्यासाठी मोठे थर लावतात. 'गोविंदा आला रे आला' असं म्हणत मुले घोळक्याने नाचताना पाहायला मिळतात. मात्र यंदा कोरोना व्हायरस संकटामुळे दहीहंडीचा उत्सव रद्द करण्यात आला आहे. त्यामुळे गोविंदा पथकांचा उत्साह मावळला आहे.
दहीहंडीचा उत्सव रद्द झाला असला तरी सध्याच्या डिजिटल युगात तुम्ही सोशल मीडिया माध्यमातून शुभेच्छा देऊन सणाचा आनंद कायम राखू शकता. सोशल मीडियाच्या फेसबुक (Facebook), व्हॉट्सअॅप (Whatsapp), इंस्टाग्राम (Instagram), ट्विटर (Twitter) वरुन दहीहंडीच्या शुभेच्छा देण्यासाठी खास मराठमोठे संदेश, शुभेच्छापत्रं, Wishes, Messages, HD Images. (श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त लहान मुलांना कृष्ण आणि राधेच्या रुपात कसे तयार कराल? जाणून घ्या काही सोप्या टिप्स)
दहीहंडी 2020 शुभेच्छा!
तुझ्या घरात नाही पाणी
घागर उताणी रे गोपाळा
गोविंदा रे गोपाळा...
दहीहंडिच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
दह्यात साखर, साखरेत भात
उंच दहीहंडी उभारुन देऊ एकमेकांना साथ
फोडू हंडी लावून थरावर थर
जोशात साजरा करु आज गोपाळकाल्याचा सण
गोपाळकाल्याच्या हार्दिक शुभेच्छा!
राधेची भक्ती
बासरीचा स्वर
लोण्याचा स्वाद
आणि गोपिकांचा रास
मिळून साजरा होता गोपालकाल्याचा सण खास!
गोपालकाल्याच्या शुभेच्छा!
फुलांचा हार
पावसाची सर
राधा-कृष्णाच्या प्रेमाला आली बहर
साजरा करुया गोपालकाल्याचा सण!
दहीहंडीच्या खूप खूप शुभेच्छा!
कृष्ण ज्याचे नाव, गोकुळ ज्याचे धाम
अशा या श्रीकृष्णाला सादर प्रणाम
गोपाळकाल्याच्या हार्दिक शुभेच्छा!
WhatsApp Stickers च्या माध्यमातून द्या दहीहंडीच्या शुभेच्छा:
सण समारंभ यांच्या शुभेच्छा देण्यासाठी आजकाल WhatsApp अगदी सर्रास वापरले जाते. दहीहंडीच्या शुभेच्छाही तुम्ही व्हॉट्सअॅप स्टिकर्सच्या माध्यमातून देऊ शकता. त्यासाठी गुगल प्ले स्टोअरवर व्हॉट्सअॅप स्टिकर्स डाऊनलोड करा आणि नातेवाईक, मित्रमंडळींना पाठवा.
श्रीकृष्णाच्या अलौकिक व्यक्तिमत्त्वाने भारतवासियांना भारावून टाकले आहे. त्यामुळे अनेक वर्षे जन्माष्टमी आणि दहीहंडीचा सण देशात उत्साहात साजरा होत आहे. दहीहंडी फोडल्यानंतर फुटलेल्या हंड्यांचे तुकडे शुभ म्हणून घरी घेऊन जातात. केवळ भारतीयच नाही तर अनेक परदेशी लोकही कृष्णाचे भक्त आहेत.