Chocolate Day 2021 Gift Ideas: यंदाच्या चॉकलेट डे ला 'ही' खास गिफ्ट्स देऊन करा तुमच्या व्हॅलेन्टाईनला सरप्राईज!
फेब्रुवारी महिना म्हटला की, व्हॅलेन्टाईन डे चे वेध लागतात. अवघ्या काही दिवसांत व्हॅलेटाईन वीक ला सुरुवात झाली होईल. चॉकलेट डे हा व्हॅलेन्टाईन वीक मधला हा तिसरा दिवस.
फेब्रुवारी महिना म्हटला की, व्हॅलेन्टाईन डे (Valentine's Day) चे वेध लागतात. अवघ्या काही दिवसांत व्हॅलेटाईन वीक (Valentine's Week) ला सुरुवात झाली होईल. चॉकलेट डे (Chocolate Day) हा व्हॅलेन्टाईन वीक मधला हा तिसरा दिवस. प्रेमाचा हा आठवडा हा विविध दिवसांनी नटलेला आहे. त्यातील प्रत्येक दिवसाचे खास वैशिष्ट्य आहे. चॉकलेट हा प्रत्येकाच्या आवडीचा पदार्थ आणि चॉकलेटमुळे कोणाच्याही मूडमध्ये अगदी क्षणार्धात बदल होऊ शकतो.
तुम्हीही तुमच्या जोडीदाराला चॉकलेट डे निमित्त गिफ्ट देऊ इच्छित असाल. परंतु, त्यांच्यासाठी परफेक्ट चॉकलेट डे गिफ्ट शोधण्यास तुम्ही कन्फूज होत असला तर खालील पर्याय तुम्हाला नक्कीच मदत करतील. तर मग यंदाच्या चॉकलेट डे ला ही खास गिफ्ट्स देऊन करा तुमच्या व्हॅलेन्टाईनला सरप्राईज!
हार्ट आणि किसेसचा चॉकलेट बुके:
हा चॉकलेट बुके वेगवेगळ्या फुलांच्या आकारात बनवलेला असतो. यामध्ये हार्टच्या आकाराचे स्पेशल चॉकलेट असतात. या चॉकलेट बुकेसोबत एक स्ट्रॉबेरीचा बॉक्स सुद्धा तुम्ही तुमच्या प्रिय व्यक्तीला देऊ शकता.
Ferrero Rocher fine Hazelnut Chocolates:
Ferrero Rocher हे एक सुप्रसिद्ध आणि लोकप्रिय चॉकलेट आहे. या Ferrero Rocher च्या हेझलनट चॉकलेट्स च्या पॅकमध्ये 48 चॉकलेट्स असतात. तुम्ही तुमच्या पार्टनरसोबत या स्पेशल पॅकचा आनंद घेऊ शकाल.
पर्सनलाईझड चॉकलेट्स:
चॉकलेट डे निमित्त पर्सनलाईझड चॉकलेट्सचा ट्रेंड सध्या सुरु आहे. बऱ्याच ठिकाणी तुम्हाला हवे तसे, वेगवेगळ्या आकाराचे, फ्लेव्हर्सचे चॉकलेट बनवून मिळतात.
केक:
पार्टनरच्या आवडीच्या चॉकलेट फ्लेव्हरचा केक कट करुन यंदाचा चॉकलेट डे सेलिब्रेट करु शकता.
चॉकलेट डे गिफ्ट पॅक:
चॉकलेट डे निमित्त बाजारामध्ये विविध चॉकलेट गिफ्ट पॅक्स उपलब्ध आहेत. यामध्ये चॉकलेट सोबत टेडी बियर, फुलांचा गुच्छ आणि ग्रिटिंग कार्डसुद्धा उपलब्ध असते. हे गिफ्ट पॅक तुम्ही तुमच्या प्रिय व्यक्तीसोबत शेअर करु शकता.
चॉकलेट स्पा:
काहीतरी हटके गिफ्ट देण्यासाठी हा पर्याय अतिशय उत्तम आहे. चॉकलेट डे निमित्त तुम्ही कपल स्पा चा आनंद घेऊ शकता किंवा होम स्पा कीट गिफ्ट करुन घरच्या घरी स्पा एन्जॉय करु शकता.
चॉकलेट मेकिंग क्लासेस:
नवीन कला शिकण्यात एक वेगळाच आनंद असतो. चॉकलेट डे निमित्त चॉकलेट मेकिंग क्लासेस ला एनरोल करुन तुम्ही वेगळ्या पद्धतीने चॉकलेट डे सेलिब्रेट करु शकता.
यापैकी कोणता पर्याय तुमच्या सोयीचा किंवा आवडीचा आहे ते पहा. त्याचबरोबर तुमच्या प्रिय व्यक्तीची आवडही लक्षात घ्या आणि यंदाचा चॉकलेट डे खास करा.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)