Chinchpokli Cha Chintamani Patpujan 2019 Live Streaming: चिंचपोकळीचा चिंतामणी पाटपूजन सोहळा आज विनायक चतुर्थी च्या मुहूर्तावर रंगणार; इथे पहा थेट प्रक्षेपण
दुपारी 3 वाजल्यापासून मंडळाच्या फेसबुक, इंस्टग्राम व युट्युब पेज वर या सोहळ्याचे लाईव्ह दृश्य पाहता येणार आहे
Chinchpokli Cha Chintamani Patpujan Sohla 2019: मुंबईतील सर्वात जुन्या गणेशोत्सव मंडळांच्या यादीतले दुसऱ्या क्रमांकाचे नाव म्हणजे चिंचपोकळीचा चिंतामणी (Chinchpoklicha Chintamani). आज, विनायक चतुर्थीचा (Vinayak Chaturthi) मुहूर्त साधत चिंचपोकळी सार्वजनिक उत्सव मंडळातर्फ़े चिंतामणीचा पाटपूजन सोहळा आयोजित करण्यात आला आहे. प्रतिवर्षी प्रमाणे आजही चिंचपोकळी रेल्वे स्थानकाच्या पुलाखालील पारंपरिक मंडपात या मानाच्या राजाचा पाटपूजन सोहळा पार पडणार आहे. यंदाचे हे 100 वे वर्ष असल्याने या शतकपूर्ती वर्षातील पहिल्या सोहळ्यासाठी भाविकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. गणेशोत्सव आणि विसर्जन मिरवणूकीदरम्यान 'या' गोष्टींबाबत सुरक्षा नक्की बाळगा
दरवर्षी याच उत्साहाने मुंबई व मुंबई बाहेरील हजारो भाविक चिंपोकळीच्या गल्लीत गर्दी करतात, या भाविकांचे कष्ट वाचवण्यासाठी काही वर्षांपासून मंडळातर्फ़े या सोहळ्याचे लाईव्ह स्ट्रीमिंग करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. यंदाही तुम्ही दुपारी 3 वाजल्यापासून मंडळाच्या फेसबुक, इंस्टग्राम व युट्युब पेज वर या पाटपूजन सोहळ्याचे लाईव्ह दृश्य पाहू शकता. Vinayak Chaturthi 2019: विनायक चतुर्थी दिवशी 'या' पद्धतीने करा श्रीगणेशाची पूजा, आयुष्यात सुख-समृद्धी लाभेल
इथे पहा चिंतामणीच्या पाटपूजन सोहळ्याचे Live Streaming
*ChinchpokliChaChintamaniOfficial/Facebook
*ChinchpokliChaChintamani/Youtube
*chinchpoklicha_chintamani/Instagram
यंदाच्या सोहळ्यात मल्लखांबाची शतकी सलामी व खास ढोल पथकांचे वादन हे वैशिष्ट्य असणार आहे. दरवर्षी चिंतामणीचा पाद्यपूजन सोहळा झाल्यावर परेल येथील खातूंच्या कार्यशाळेत चिंतामणीची मूर्ती घडवली जाते. चिंतामणीचे मूर्तिकार विजय खातू यांच्या निधनानंतर हा वसा त्यांच्या मुलीने म्हणजेच रेश्मा खातू हिने चालू ठेवला होता.