Chhatrapati Shivaji Maharaj’s Coronation Ceremony: शिवराज्याभिषेक सोहळा उद्घाटन कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदेशाचे प्रक्षेपण

त्यानिमित्त 1 जून पासून रायगड येथे विविध सांस्कृतीक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. दरम्यान, 2 जून रोजी सकाळी 8.30 वाजता या कार्यक्रमांचा शुभारंभ होणार आहे.

PM Narendra Modi

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक (Chhatrapati Shivaji Maharaj’s coronation) सोहळ्याला येत्या 2 जून रोजी 350 वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्त 1 जून पासून रायगड येथे विविध सांस्कृतीक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. दरम्यान, 2 जून रोजी सकाळी 8.30 वाजता या कार्यक्रमांचा शुभारंभ होणार आहे. या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांच्या संदेशाचे प्रक्षेपण केले जाणार आहे.

प्राप्त माहितनुसार या याक्रमासाठी राज्य आणि देशभरातील विविध नेते उपस्थित राहणार आहेत. यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत, केंद्रीय संस्कृती मंत्री जी. किशन रेड्डी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार, पालकमंत्री उदय सामंत, रायगड विकास प्राधिकरणचे अध्यक्ष संभाजी राजे छत्रपती यांच्यासह इतरही अनेक लोकप्रतिनिधींचा समावेश आहे. सोबतच शिवप्रेमीसुद्धा मोठ्या प्रमाणावर उपस्थित असणार आहेत.

शासकीय अधिकाऱ्यांच्या हवाल्याने वृत्तसंस्थांनी दिलेल्या वृत्तात म्हटले आहे की, 17 व्या शतकातील प्रतिष्ठित शासकाच्या 1674 मधील राज्याभिषेकाच्या स्मरणार्थ राज्य सरकारने 2 जूनपासून अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. रायगड जिल्ह्यातील उद्घाटन कार्यक्रमादरम्यान मोदींचा संदेश प्रसारित केला जाईल.