IPL Auction 2025 Live

Chhatrapati Shivaji Maharaj Quotes: शिवजयंती च्या निमित्ताने पुढच्या पिढीपर्यंत शिवरायांचे सकारात्मक विचार WhatsApp Status, Facebook Messages द्वारा नक्की करा शेअर!

महाराष्ट्राबाहेरचे अनेक लोक शिवजयंतीचा दिवस म्हणून वैशाख शुद्ध तृतीया दिवशी देखील शिवजयंती साजरी करतात.

शिव जयंती । File Image

महाराष्ट्रामध्ये हिंदवी स्वराज्याची स्थापना करणार्‍या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचा (Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti) सोहळा तारखेप्रमाणे 19 फेब्रुवारी दिवशी साजरा केला जातो. मराठा साम्राज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा करण्यासाठी हा दिवस खास असतो. अनेक शिवभक्त आपल्या क्षमतेनुसार शिवरायांप्रति आपली कृतज्ञता व्यक्त करत असतात. शत्रूच्याही मनात धडकी भरवणार्‍या शिवरायांच्या पराक्रमाच्या गाथा आज 21 व्या शतकामध्येही प्रेरणादायी आहेत. मग शिवरायांचे विचार पुढील पिढी पर्यंत नेण्यासाठी त्यांचीचं ही वचनं तुम्ही नक्की WhatsApp Status, Facebook Messages, Wishes, Quotes, Greetings द्वारा शेअर करा. या निमित्ताने शिवरायांच्या विचारांचा वारसा पुढल्या पिढीपर्यंत पोह्चवण्यासाठी एक पाऊल नक्की उचला.

१८६९ साली महात्मा फुले यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांची रायगड येथील समाधी शोधून शिव जयंती साजरी करण्यास सुरूवात केली. पण हा दिवस तिथी नुसार की तारखेनुसार साजरा करावा याबद्द्ल मतंमतांतर आहेत. पण राज्य शासनाकडून 19 फेब्रुवारी दिवशी शिवजयंती साजरी केली जाते. हा महाराष्ट्रात सुट्टीचा दिवस आहे.

शिवजयंतीच्या शुभेच्छा

शिव जयंती । File Image
शिव जयंती । File Image
शिव जयंती । File Image
शिव जयंती । File Image
शिव जयंती । File Image

महाराष्ट्रातले काही लोक मराठी पंचांगाप्रमाणे फाल्गुन वद्य तृतीया हा दिवस शिवजयंती म्हणून पाळतात. महाराष्ट्राबाहेरचे अनेक लोक शिवजयंतीचा दिवस म्हणून वैशाख शुद्ध तृतीया दिवशी देखील शिवजयंती साजरी करतात. छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार समाजातल्या प्रत्येकापर्यंत पोहोचावेत. या उद्देशाने शिवजयंती साजरी करण्यास सुरूवात झाली. इंग्रजांच्या विरोधात तरुणांची एकी होणं आणि तरुण राष्ट्रविचारी होणं गरजेचं होतं त्यासाठी टिळकांनी शिवजयंती सार्वजनिक स्वरूपात साजरी करण्यास सुरूवात केली आहे.