Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti 2023 Date: महान शासक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचा इतिहास आणि महत्त्व, जाणून घ्या
छत्रपती शिवाजी महाराज जयंती 2023 जवळ येत आहे, तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीची तारीख, उत्सवाचा इतिहास आणि महत्त्व माहिती असणे आवश्यक आहे, जाणून घ्या संपूर्ण माहिती
Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti 2023 Date: छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती जगभरात मोठ्या उत्साहाने साजरी केली जाते. हा दिवस शिवजयंती म्हणूनही ओळखला जातो, जयंतीच्या दिवशी महाराष्ट्रात सार्वजनिक सुट्टी असते. छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती दरवर्षी 19 फेब्रुवारी रोजी साजरी केली जाते, शिवाजी महाराज, पहिले छत्रपती आणि मराठा साम्राज्याचे संस्थापक होते. शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या दिवशी लोक शिवाजी महाराजांनी राष्ट्रासाठी दिलेल्या योगदानाचे स्मरण करतात. यावर्षी, भारत 19 फेब्रुवारी 2023 रोजी शिवाजी महाराजांची 393 वी जयंती साजरी करेल. छत्रपती शिवाजी महाराज जयंती 2023 जवळ येत आहे, तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीची तारीख, उत्सवाचा इतिहास आणि महत्त्व माहिती असणे आवश्यक आहे.
छत्रपती शिवाजी महाराज जयंतीचा इतिहास
महात्मा फुले हे थोरसमाजसुधारक होते, ज्यांनी 1870 मध्ये शिवाजी जयंती साजरी करण्यास सुरुवात केली जी नंतर बाळ गंगाधर टिळकांनी पुढे सुरु ठेवली. शिवाजी महाराजांचा जन्म शिवनेरी किल्ल्यावर मराठी शालिवाहन हिंदू कॅलेंडर फाल्गुन कृष्ण पक्ष 3, 1551/जुलियन फेब्रुवारी 19, 1630 रोजी झाला होता. ऐतिहासिक नोंदीनुसार, शिवाजी महाराज फक्त 16 वर्षांचे असताना त्यांनी तोरणा किल्ला जिंकला आणि वयाच्या 17 व्या वर्षी रायगड आणि कोंढाणा किल्ले ताब्यात घेतले. शिवाजी महाराजांनी दरबारात आणि प्रशासनात मराठी आणि संस्कृतच्या वापराला चालना दिली.
छत्रपती शिवाजी महाराज जयंतीचे महत्त्व
छत्रपती शिवाजी महाराज जयंतीचे लोकांसाठी खूप महत्त्व आहे आणि हा दिवस मोठ्या उत्साहात आणि उत्साहाने साजरा केला जातो. शिवाजी महाराजांचे नाव शिवाजी भोसले होते आणि ते भोसले मराठा वंशाचे होते. महाराज सर्वात महान मराठा शासक मानला जातात. महाराजांनी विजापूरच्या ढासळत्या आदिलशाही सल्तनतपासून साम्राज्याचे रक्षण केले ज्यामुळे मराठा साम्राज्याची सुरुवात झाली. शिवरायांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. दरम्यान, शिवजयंतीच्या दिवशी लोक त्यांच्या शौर्याचे स्मरण करतात. शिवजयंतीच्या दिवशी, संपूर्ण महाराष्ट्रात मिरवणुका काढल्या जातात आणि लोक महान शासक शिवाजी महाराज यांच्या जीवनाचे वर्णन करणारी नाटके दाखवतात, अनेक ठिकाणी वेगवेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन करू जयंती उत्साहात साजरी केली जाते.