Shiv Jayanti 2021 Songs: छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 'या' गौरव गीतांनी साजरी करा यंदाची शिवजयंती!

यंदाच्या शिवजयंती निमित्त छत्रपती शिवाजी महाराज यांची ही गौरव गीतं ऐकून तुम्ही वातवरण आनंदी, चैतन्यदायी करु शकता.

Chhatrapati Shivaji Maharaj (Photo Credits: Wikimedia Commons)

शिवभक्तांमध्ये शिवजयंती (Shiv Jayanti) साजरी करण्यावरुन वाद आहेत. त्यामुळे महाराष्ट्रात दोनदा शिवजयंती साजरी केली जाते. एकदा तारखेप्रमाणे आणि एकदा तिथीप्रमाणे. 19 फेब्रुवारी रोजी तारखेनुसार, शिवजयंती साजरी होणार आहे. शिवजयंती निमित्त राज्यभरात उत्साहाचे वातावरण असते. शिवनेरी गडावर शिवभक्त मोठ्या प्रमाणावर शिवजयंतीचा उत्सव साजरा करतात. केवळ शिवनेरीवरच नाही तर राज्यभरात अनेक ठिकाणी शिवजयंती उत्सवाची धामधूम असते. सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. परंतु, यंदा कोविड-19 संकटामुळे शिवजयंती साधेपणाने साजरी करण्याचे आवाहन सरकारकडून करण्यात आले आहे. (Shiv Jayanti 2021: शिवजयंती निमित्त रत्नागिरीच्या तरुणाने साकारली महाराजांची जगातील सर्वात लहान रांगोळी, See Pics)

शिवजयंती साजरी करण्यावर बंधनं आली म्हणून नाराज होण्याचे कारण नाही. यंदाच्या शिवजयंती निमित्त छत्रपती शिवाजी महाराज यांची ही गौरव गीतं ऐकून तुम्ही वातवरण आनंदी, चैतन्यदायी करु शकता. (Shiv Jayanti 2021: कडबा वापरुन अर्ध्या एकरात साकारली शिवप्रतिमा; सोलापूर येथील महाविद्यालयीन युवकांची कलात्मकता, पाहा VIDEO)

शिवाजी महाराज गीतं!

आदर्श आणि उत्कर्ष शिंदे यांच्या आवाजातील 'राजाचं राजपण' हे महाराजांचे गौरवगीत.

जय भवानी जय शिवाजी गाणे.

फर्जंद सिनेमातील शिवबा आमचा मल्हारी गाणे.

आदर्श शिंदे याच्या आवाजातील शिवरायांची आरती.

'बघतोस काय मुजरा कर' सिनेमातील 'माझ्या राजा रं' गाणं.

यंदा शिवजयंती निमित्त प्रभात फेरी, बाईक रॅली, मिरवणुका काढण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. तसंच शिवजयंती निमित्त सार्वजनिक ठिकाणी होणाऱ्या कार्यक्रमांनाही केवळ 100 जणांना उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात आली आहे. यासोबत मास्क घालणे, सॅनिटायझरचा वापर, सोशल डिस्टसिंग याकडे विशेष लक्ष देण्यात यावे, असेही सांगण्यात आले आहे.