Happy Rang Panchami 2023 Messages: रंगपंचमी निमित्त Wishes, Greetings, Images, WhatsApp Status च्या माध्यमातून शेअर करुन साजरा करा रंगांचा सण!
रंगपंचमी निमित्त तुम्ही Wishes, Greetings, Images, WhatsApp Status च्या माध्यमातून खास ईमेज शेअर करुन आपल्या मित्र-परिवारास रंगाच्या सणाच्या शुभेच्छा देऊ शकतो.
Happy Rang Panchami 2023 Messages: प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही होळीचा सण मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात आला. होळीच्या निमित्ताने लोक रंगोत्सव साजरा करतात. लोक एकमेकांना रंग लावून होळी खेळतात. होळी हा दोन दिवसांचा सण आहे, ज्यामध्ये पहिल्या दिवशी होलिका दहन केले जाते आणि दुसऱ्या दिवशी रंगांची होळी खेळली जाते. मात्र, होळीचा उत्साह अजूनही कायम आहे. होळीनंतर पाच दिवसांनी रंगपंचमी साजरी केली जाते. या दिवशी रंगांचा सणही असतो. या दिवशी देव होळी खेळतात आणि देवता रंगोत्सव साजरा करतात असे म्हणतात. रंगपंचमी हा सण होळीच्या पाचव्या दिवशी म्हणजेच चैत्र कृष्ण पंचमीला साजरा केला जातो. यंदा 12 मार्चला रंगपंचमी साजरी होत आहे.
दरवर्षी रंगपंचमी हा सण धुलेंडीच्या पाचव्या दिवशी म्हणजेच होळीच्या रंगांनी साजरा केला जातो. चैत्र कृष्ण पंचमीला रंगपंचमी साजरी केली जाते म्हणून याला रंगपंचमी म्हणतात. याला कृष्ण पंचमी असेही म्हणतात. याशिवाय रंगपंचमीला श्री पंचमी किंवा देवपंचमी असेही म्हणतात. यंदा 12 मार्च 2023 रोजी रंगपंचमी साजरी होत आहे. हा दिवस देवी-देवतांना समर्पित आहे आणि देशभरात मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. रंगपंचमी निमित्त तुम्ही Wishes, Greetings, Images, WhatsApp Status च्या माध्यमातून खास ईमेज शेअर करुन आपल्या मित्र-परिवारास रंगाच्या सणाच्या शुभेच्छा देऊ शकतो.
रंगून जाऊ रंगात आता, अखंड उठु दे मनी तरंग,
तोडून सारे बंध सारे, असे उधळुया आज हे रंग…
रंग पंचमीच्या हार्दिक शुभेच्छा !
रंग न जाणती जात नी भाषा
उधळण करूया चढू दे प्रेमाची नशा…
मैत्री अन नात्यांचे भरलेले तळे
भिजूनी फुलवुया प्रेम रंगांचे मळे…
होळीच्या रंगमय शुभेच्छा !!!
रंग हर्षाचा, रंग सुखाचा, रंग आनंदाचा,
रंग आपुलकीचा, रंग बंधांचा,
रंग उल्हासाचा, रंगात रंगला रंग असा,
तुमच्या आमच्या प्रेमाच्या नात्याचा
तुमच्या गोड परिवारास रंगपंचमीच्या शुभेच्छा!
उरले सुरले क्षण जेवढे,
आनंदाने जगत जाऊ..
रंगात रंगून होळीच्या
हर्ष उधळत राहू..
रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा!
एक रंग मैत्रीचा
एक रंग आनंदाचा
सण आला उत्सवाचा
साजरा करुया चला सण रंगाचा
रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा!
रंगपंचमीशी संबंधित मान्यतेनुसार, या दिवशी भगवान श्रीकृष्णाने राधा राणीसोबत होळी खेळली होती. म्हणूनच या दिवशी श्रीकृष्ण आणि राधा राणीची पूजा केली जाते. पूजेच्या वेळी कान्हा आणि राधा राणीला रंग लावला जातो. विशेषतः महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये हा सण मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो.