Bollywood Raksha Bandhan Song: 'या' टॉप 5 बॉलीवूड क्लासिक गाण्यांसह साजरा करा भावा-बहिणींचा सण रक्षाबंधन, Watch Video

या लेखात आम्ही टॉप 5 क्लासिक बॉलीवूड गाण्यांचा संग्रह सादर करत आहोत जो ऐकून तुम्ही रक्षाबंधनाचा सण अधिक खास करू शकता.

Zee Music Company (Photo Credits: Youtube)

Bollywood Raksha Bandhan Song: रक्षाबंधन हा भाऊ आणि बहिणीचा सर्वात मोठा सण आहे. दरवर्षी मोठ्या उत्साहात संपूर्ण देशात हा सण थाटामाटात साजरा केला जातो. या दिवशी भाऊ आणि बहीण एकमेकांबद्दल त्यांचे प्रेम, आपुलकी आणि कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी एकत्र येतात. तुम्ही रक्षाबंधनाच्या दिवशी भाऊ-बहिणीच्या नात्यावरील खास बॉलीवूड गाणी ऐकून तसेच शेअर हा सण अधिक चांगल्या प्रकारे साजरा करू शकता. या लेखात आम्ही टॉप 5 क्लासिक बॉलीवूड गाण्यांचा संग्रह सादर करत आहोत जो ऐकून तुम्ही रक्षाबंधनाचा सण अधिक खास करू शकता.

रक्षाबंधन टाइटल ट्रॅक -

अक्षय कुमार स्टारर रक्षाबंधन चित्रपट गेल्या वर्षी प्रदर्शित झाला होता, जो भाऊ आणि बहिणीच्या प्रेमावर आधारित होता. या चित्रपटाला प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळाले, विशेषत: त्यातील गाणी सुपरहिट झाली आणि रक्षाबंधनापूर्वीच प्रत्येक घराघरात ही गाणी वाजू लागली. भाऊ-बहिणीच्या भावनांना उजाळा देणारे रक्षाबंधनाचे शीर्षक गीत खूप लोकप्रिय आहे. (हेही वाचा - Raksha Bandhan 2023: रक्षाबंधनाची तारीख आणि शुभ मुहूर्त जाणून घ्या; वाचा 'या' सणाचे विशेष महत्त्व आणि इतिहास)

फूलों का तारों का:

हरे रामा हरे कृष्णा चित्रपटातील रक्षाबंधन हे गाणे भावा-बहिणींमधील प्रेम व्यक्त करते. गाण्याचे बोल आणि ट्यूनमुळे ते गेल्या काही वर्षांपासून रक्षाबंधन उत्सवासाठी लोकप्रिय झाले आहे.

बहना ने भाई की कलाई -

रेशम की डोरी चित्रपटातील हे गाणं आजही रसिकांच्या मनावर राज्य करते. सुमन कल्याणपूर यांनी गायलेले, एका बहिणीच्या भावनांचे सुंदर चित्रण करते कारण ती आपल्या भावाच्या मनगटावर राखी बांधते आणि त्याच्या आरोग्यासाठी प्रार्थना करते.

भैया मेरे राखी के बंधन:

छोटी बहन चित्रपटातील हे गाणे रक्षाबंधन उत्सवाचा अविभाज्य भाग बनले आहे. लता मंगेशकर यांनी गायलेले हे गाणे भाऊ-बहिणीचे स्नेहपूर्ण नाते आणि एक साधा धागा त्यांच्यातील बंध कसा घट्ट करतो याचे चित्रण आहे.

धागों से बांधा:

राखीच्या निमित्ताने अक्षय कुमार स्टारर रक्षाबंधन या चित्रपटातील धागों से बंध हे गाणे खूपचं प्रसिद्ध झाले. बहुतेक लोक या गाण्यावर जोरदार रील बनवत आहेत आणि सोशल मीडियावर भाऊ-बहिणीमधील प्रेम आणि संघर्ष शेअर करत आहेत. हे गाणे ऐकून तुम्हीही भावूक व्हाल.

रक्षाबंधन हा एक सण आहे जो भाऊ आणि बहिणींमधील अनोखे आणि प्रेमळ बंध साजरा करतो. ही खास गाणी ऐकून तुम्ही रक्षाबंधनाचा सण आणखी खास करू शकता. या गाण्यातून भावा-बहिणीचं प्रेम, सुरक्षितता आणि एकजुटीची भावना दिसते.