Mahaparinirvan Din Quotes in Marathi: महापरिनिर्वाण दिनानिमित्त WhatsApp Status, Greetings, Messages, Wishes च्या माध्यमातून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अर्पण करा आदरांजली!
बाबासाहेब आंबेडकरांना विनम्र अभिवादन करू शकता. यासाठी तुम्ही खालील ईमेज मोफत डाऊनलोड करू शकता.
Mahaparinirvan Din Quotes in Marathi: भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, संविधान निर्माता डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) यांच्या पुण्यतिथीला म्हणजेच 6 डिसेंबर रोजी महापरिनिर्वाण दिन (Mahaparinirvan Din) साजरा केला जातो. विशेषत: बौद्ध धर्माचे लोक हा दिवस मोठ्या श्रद्धेने साजरा करतात. या दिवशी लोक त्यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून दिवे आणि मेणबत्त्या पेटवतात. महापरिनिर्वाण दिनी बाबासाहेबांना आदरांजली वाहण्यासाठी चैत्यभूमीवरही लोकांची गर्दी जमते. या दिवशी बौद्ध भिक्खूंसह अनेक लोक पवित्र गीते गातात आणि बाबा साहेबांच्या घोषणा देतात. (हेही वाचा -Mahaparinirvan Diwas 2023: डॉ. बाबासाहेब आंबेडकर 'महापरिनिर्वाण दिन' तारीख आणि महत्त्व घ्या जाणून)
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दलिताच्या प्रगतीसाठी भरीव योगदान दिलं. त्यांच्या या महान त्यागामुळे आजही ते लोकांच्या मनामध्ये देवाप्रमाणे पूजले जात आहेत. महापरिनिर्वाण दिनानिमित्त WhatsApp Status, Greetings, Messages, Wishes च्या माध्यमातून तुम्ही डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना विनम्र अभिवादन करू शकता. यासाठी तुम्ही खालील ईमेज मोफत डाऊनलोड करू शकता. (हेही वाचा - Mahaparinirvan Din Quotes in Marathi: महापरिनिर्वाण दिन निमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे 'हे' अनमोल विचार शेअर करून करा महामानवाला त्रिवार अभिवादन!)
न्याय मिळवुन देण्यासाठी तो रात्रंदिवस झुरला..
दलितांच्या अंधाऱ्या दुनियेत तो एकटाच सुर्य ठरला..
“अरे गर्वाने देतो आम्ही त्याला देवाची जागा”
कारण एका महाराचा मुलगा,
अवघ्या 33 कोटींना पुरला..
महापरिनिर्वाणदिनी महामानवास,
विनम्र अभिवादन !
प्राणाची आहुती दिली, आमच्या जीवनासाठी..
त्रास भोगला किती, आमच्या हसण्यासाठी..
कसे विसरू बाबा तुमचे उपकार,
हा जन्म वाहिला मी फक्त तुमचे गुणगान गाण्यासाठी..
डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिना निमित्त,
विनम्र अभिवादन !
लोकांनी सत्याच्या मार्गावर चालावे यासाठी बनले ते मार्गदर्शक
वेळप्रसंगी योग्य वाट दाखविण्यासाठी बनले त्यांचे दिशादर्शक
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनी कोटी कोटी प्रणाम!
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त
त्यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन…!
देशात एकता, समता, बंधुता नांदावी
म्हणून आयुष्यभर झटणाऱ्या महामानवाला
महापरिनिर्वाण दिनानिमित्त
कोटी कोटी प्रणाम!!!
देवावर अवलंबून राहू नका.
जे करायचे ते मनगटाच्या जोरावर करा.
असा संदेश देणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर
यांच्या स्मृतीस महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्रिवार अभिवादन!
बौद्ध अनुयायांच्या मते डॉ.आंबेडकरांनाही त्यांच्या कार्यातून निर्वाण मिळाले आहे. म्हणून त्यांची पुण्यतिथी महापरिनिर्वाण दिन म्हणून साजरी केली जाते.