भाऊबीज 2018: बहीण भावाच्या नात्याची महती सांगणारी मराठीतील सदाबहार गीते (व्हिडिओ)

म्हणूनच भाऊबीजेच्या आजच्या खास दिनी मराठीतील ही टॉप 5 सदाबहार गिते. खास आमच्या वाचकांसाठी....

भाऊबीज 2018 (संग्रहित, संपादित प्रतिमा)

हिंदू संस्कृतीत दिवाळी सणाला एक आगळेवेगळे महत्त्व आहे. लक्ष लक्ष दिव्यांनी उजळणारा हा उत्सव देशविदेशातील असंख्य नागरिकांच्या आनंदाचा केंद्रबिंदू. वसुबारस, धनत्रयोदशी, लक्ष्मीपूजन, बलिप्रतिपदा आणि भाऊबीज हे या सणातील महत्त्वाचे दिवस. या प्रत्येक दिवसाचे ठरलेले असे एक महत्त्व आहे. अर्थात भाऊबीज या दिवसाचेही वेगळे असे महत्त्व ओघाने आलेच. भाऊबिजेचा आणखी एक महत्त्वाचा पैलू असा की, बहीण-भावाच्या नात्याचा अविष्कार दाखवणाऱ्या या दिवसाचे मराठी चित्रपटसृष्टीलाही विशेष प्रेम आहे. मराठीतील अनेक चित्रपटांमध्ये भाऊबहिणिच्या नात्यासोबतच भाऊबीजेची महितीही सांगितली आहे. असे अनेक चित्रपट आहेत ज्याची कथा भाऊबहीणीच्या नात्यावर आधारीत आहे किंवा चित्रपटातील गीत हे भाऊबीजेच्या संकल्पनेवर आधारीत आहे. म्हणूनच भाऊबीजेच्या आजच्या खास दिनी मराठीतील ही टॉप 5 सदाबहार गिते. खास आमच्या वाचकांसाठी....

 

'भाऊबीज' सिनेमातील हे गाणं. गीत कवी संजिव यांचं. स्वर आशा भोसले आणि गीताला संगीत दिले आहे वसंत मोहिते यांनी. गेली अनेक वर्षे हे गीत मराठी रसिकांच्या मनात अढळ स्थान निर्माण करुन आहे.

'वारणेचा वाघ' या चित्रपटातील हे गीत गायलंय आशा पागधरे यांनी. या गिताला उषा मंगशकर यांनी कोरस दिला आहे. केवळ ग्रामिण महाराष्ट्रच नव्हे तर, शहरातील प्रेक्षकांनीही हा चित्रपट अक्षरश: डोक्यावर घेतला होता. या गाण्यातूनही बहीण भावाच्या प्रेमाची व्याकूळता डोकावते. (हेही वाचा, भाऊबीज दिवशी कोणत्या मुहूर्तावर ओवाळणी करणं अधिक शुभ ठरेल)

माहेरची साडी या चित्रपटातील हे एक अतिशय गाजलेले गीत. अभिनेत्री अलका कुबल आणि अभिनेता अजिंक्य देव यांच्यावर हे गीत चित्रीत झाले आहे. अनिल मोहिले यांनी या गीताला संगीत दिले आहे. बहीण भावाच्या प्रेमातील अर्तता या गाण्यातून व्यक्त होते.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif