Best Sarvajanik Ganeshotsav Mandal Spardha 2023: उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धेसाठी मुदत संपण्यापूर्वी कुठे, कसा कराल अर्ज, घ्या जाणून
राज्य शासनाने आयोजित केलेल्या या स्पर्धेसाठी आपण ऑनलाईन अर्ज दाखल करु शकता. मात्र, हे अर्ज आपल्याला योग्य अटी व शर्थींचे पालन करुन आणि तेसुद्धा विहीत मुदतीमध्येच दाखल करावे लागणार आहेत.
Sarvajanik Ganeshotsav Mandal Spardha 2023: उत्कृष्ठ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धेसाठी तुमचे मंडळ जर अर्ज करु इच्छित असेल तर तुमच्यासाठी ही माहिती महत्त्वाची आहे. राज्य शासनाने आयोजित केलेल्या या स्पर्धेसाठी आपण ऑनलाईन अर्ज दाखल करु शकता. मात्र, हे अर्ज आपल्याला योग्य अटी व शर्थींचे पालन करुन आणि तेसुद्धा विहीत मुदतीमध्येच दाखल करावे लागणार आहेत. त्यानंतरच आपल्या अर्जाचा विचार केला जाऊ शकतो. त्यासाठी अर्ज कोठे, कोणाकडे करायचा, त्याची अंतिम मुदत काय? याबाबत सविस्तर माहिती येथे देत आहोत. जी आपल्याला उपयोगी येऊ शकते. घ्या जाणून.
स्पर्धेसाठी अर्ज करण्यासाठी पत्ता
गणेशोत्सव मंडळांसाठी अर्ज जिल्हा नियोजन अधिकारी, मुंबई उपनगर, पी एल देशपांडे महाराष्ट्र कला अगादमी, मुंबई यांच्या नावे आपला अर्ज mahtv.plda@gmail.com या ई-मेल पत्त्यावर स्पर्धकांना अर्ज करता येऊ शकतात.
निकालानंतर बक्षीसाची रक्कम आणि स्वरुप
प्रथम क्रमांक- 5.00 लाख रुपये पारितोषिक व प्रमाणपत्र
द्वितीय क्रमांक- 2.50 लाख रुपये पारितोषिक व प्रमाणपत्र
तृतीय क्रमांक- 1.00 लाख रुपये पारितोषिक व प्रमाणपत्र
उर्वरीत 41 गणेश मंडळांना- प्रत्येकी 25,000 रुपये पारितोषिक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येईल.
येत्या 19 सप्टेंबरपासून राज्यात गणेशोत्सव सुरु होत आहे. गणेशोत्सवादरम्यान राज्य सरकारने एक स्पर्धा आयोजित केली असून सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना पुरस्कार देणयाचा निर्णय राज्य सरकारे घेतला आहे. या स्पर्धेसाठी राज्य सरकार एकूण 44 गणेशोत्सव मंडळे निवडणार आहे. ज्यामध्ये मुंबई, मुंबई उपनगर आणि त्यासोबतच पुणे, ठाणे जिल्ह्यातील प्रत्येकी 3-3 मंडळे निवडणार आहे. शिवाय इतर जिल्ह्यांमधून प्रत्येकी 1-1 मंडळ निवडले जाणार आहे.