International Ice Cream Day 2020: आईस्क्रीम खाण्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यापासून तंदुरुस्त राहण्यापर्यंत होणारे 'हे' आश्चर्यजनक फायदे नक्की वाचा
आईस्क्रीम खाल्लायने रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यापासून ते वजन कमी करण्यासाठी फायदेशीर ठरते.
आईस्क्रीम!! ज्याच्या नावातच आईस आणि क्रीम यांचा समावेश आहे अशी गोष्ट कोणाला आवडणार नाही असे होणारच नाही. ज्याचे नाव काढताच जितके एखादं लहान मुलं खूश होत तितकंच सत्तरीतले आजी-आजोबा देखील खूश होतात. अनकांना आईस्क्रीम (Ice Cream) हा जणू जिव्हाळ्याचा विषय आहे. दूधापासून बनवलेल्या या पदार्थाचे लोकांना महत्व पटवून देण्यासाठी जगभरात जुलै महिन्याच्या तिस-या रविवारी आईस्क्रीम दिवस साजरा केला जातो. अनेक जण आईस्क्रीम थंड असल्याने सर्दी, खोकला यांसारखे आजार होऊ शकतात म्हणून आईस्क्रीम खाणे टाळतात. तर काही जण कोणताही ऋतू असो मात्र आईस्क्रीम खाणे काही बंद करत नाही. अशा या आईस्क्रीम शरीरास अनेक लाभदायक फायदे होतात हे तुम्हाला माहित आहे का?
कदाचित तुमचा याच्यावर विश्वास बसणार नाही पण हे सत्य आहे. आईस्क्रीम खाल्लायने रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यापासून ते वजन कमी करण्यासाठी फायदेशीर ठरते.
1. रोगप्रतिकारक शक्ती वाढते
आईस्क्रीममध्ये व्हिटॅमिन ए , बी-2 आणि बी-13 असते . व्हिटॅमिन ए मुळे तुमची स्किन, हाड आणि इम्यूनिटी सिस्टम वाढवते. International Ice Cream Day 2019: मुंबईतील 5 उत्कृष्ट आइसक्रीम पार्लर जिथे तुम्हाला मिळतील भन्नाट आईस्क्रीम फ्लेवर्स
2. वजन कमी होते
आईस्क्रीम खाल्ल्यामुळे वजन घटण्यास मदत होते. व्हिटॅमिन बी-2 आणि बी-12 मेटाबॉलिझमला संतुलित ठेवतो आणि बी-12 वजन कमी करण्यास सहायक असतो.
3. हाडांची मजबुती वाढते
आईस्क्रीम हे दुधापासून बनवले जाते. तसेच दुधामध्ये जास्त प्रमाणात कॅल्शियम असते. त्यामुळे कॅल्शियमच्या सेवनामुळे हाड मजबूत होतात .
4. थकवा दूर होतो
दुधापासून बनवलेल्या या आईस्क्रीममध्ये प्रोटीन आणि कॅल्शियमचे घटक असल्यामुळे थकवा शरीरात आलेला थकवा कमी होतो.
5. त्वचेसाठी फायदेशीर
आईस्क्रीम मध्ये असलेल्या प्रोटीनमुळे हाडं, स्नायू, रक्त आणि त्वचेसाठी फायदेशीर ठरतात. त्यामुळे आपला त्वचा चांगली राहते.
मग काय विचार आहे आजचा? गटारी मुळे आज झणझणीत जेवण बनवलं असेलच त्यासोबतच जेवणानंतर स्वीट डिश म्हणून आईस्क्रीम खायला काय हरकत आहे. नाही का!