August 2026 Sankashti Chaturthi Chandroday: 31 ऑगस्ट संकष्टी चतुर्थी उपवास सोडण्यासाठी आज चंद्रोदय वेळ काय?

संकष्टी व्रतात चंद्रदर्शनाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या विविध प्रांतानुसार पहा आज संकष्टी चतुर्थीचा उपवास सोडण्याची वेळ काय?

August 2026 Sankashti Chaturthi Chandroday: 31 ऑगस्ट संकष्टी चतुर्थी उपवास सोडण्यासाठी आज चंद्रोदय वेळ काय?
Sankashti Chaturthi (फोटो सौजन्य - File Image)

संकष्टी चतुर्थी (Sankashti Chaturthi) हे भगवान गणेशाला समर्पित एक मासिक व्रत आहे. दर हिंदू महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथीला संकष्टी चतुर्थी चं व्रत पाळून उपवास करण्याची रीत आहे. भाविक मनोकामना पूर्ण करण्यासाठी, विघ्न दूर करण्याच्या कामनेने बाप्पाकडे संकष्टी चतुर्थीचं व्रत करून कृतज्ञता व्यक्त करतत. "संकष्ट" या शब्दाचा अर्थ संकट किंवा अडचण असा होतो, त्यामुळे जीवनातील संकटे व अडथळे दूर व्हावेत, या हेतूने हे व्रत केले जाते. ऑगस्ट महिन्यात यंदा दोन संकष्टी चतुर्थी आल्या आहे. आज 31 ऑगस्टची संकष्टी चतुर्थी खास आहे कारण ही श्रावण मासातील संकष्टी चतुर्थी आहे.

पौराणिक मान्यतेनुसार, संकष्टी चतुर्थीचे व्रत केल्याने व श्रद्धापूर्वक पूजा केल्याने गणपती प्रसन्न होतो आणि भक्ताच्या जीवनातील अडथळे, संकटे व मानसिक तणाव दूर होतात. यामुळे जीवनात स्थिरता, यश आणि सुख-समृद्धी प्राप्त होते, अशी श्रद्धा आहे. नक्की वाचा: Sankashti Chaturthi Wishes in Marathi: संकष्टी चतुर्थीच्या शुभेच्छा देण्यासाठी मराठमोळी शुभेच्छापत्रं, Messages. 

संकष्टीला चंद्रदर्शनाचं महत्त्व

असल्याने, भाविकांनी संध्याकाळी आकाश निरभ्र आहे का, याची खात्री करावी.  मनोभावे नमस्कार करून व चंद्राचे मानसिक स्मरण करून व्रत पूर्ण करण्याची पद्धतही प्रचलित आहे. तिथी आणि चंद्रोदयाची वेळ स्थाननिहाय बदलू शकत असल्याने, अचूक वेळेसाठी स्थानिक पंचांगाचा आधार घेणे अधिक योग्य ठरते.

महाराष्ट्रातील 31 ऑगस्टच्या चंद्रोदयाच्या वेळा

मुंबई  - 20.51

पुणे- 20.47

नाशिक- 20.46

नागपूर - 20.23

रत्नागिरी- 20.51

सोलापूर- 20.39

कोल्हापूर - 20.47

संकष्टी उपवास पूजाविधी

दिवसभर उपवास केल्यानंतर संध्याकाळी गणेशपूजा केली जाते. पूजेत गणपतीला २१ दुर्वा आणि मोदक किंवा लाडवांचा नैवेद्य दाखवला जातो. रात्री चंद्रोदयानंतर तांब्याच्या भांड्यात पाणी, दूध, अक्षता आणि फुले घालून चंद्राला अर्घ्य दिले जाते. त्यानंतरच उपवास सोडला जातो (पारण केले जाते).

(The above story first appeared on LatestLY on Aug 31, 2026 08:00 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).