Atal Bihari Vajpayee 2nd Death Anniversary: भारताचे माजी पंतप्रधान भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांनी आपल्या भाषणातून सांगितलेले रोखठोक विचार
आपल्या भाषणात, बोलण्यात राजकारण वा अन्य गोष्टींविषयी ते अगदी रोखठोकपणे बोलत. पाहूयात त्यांचे हे रोखठोक विचार
Atal Bihari Vajpayee Death Anniversary: भारताच्या राजकारणात ज्यांचे नाव आवर्जून घेतले जाते असे दमदार, रोखठोक तितकंच प्रेमळ व्यक्तिमत्व असणारे भारताचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांची आज दुसरी पुण्यतिथी.... त्यांची भाषणे, त्यांचे विचार, राजकीय कारकीर्दीत त्यांने घेतलेले महत्त्वाचे निर्णय लोकांच्या कायम स्मरणात राहतील असेच आहे. अतिशय हुशार, कर्तबगार, कष्टाळू असे कैक गुणांनी परिपूर्ण असलेले अटल बिहारी वाजपेयी यांची नम्रता त्यांच्या बोलण्यातून लोकांना कळायची. त्यांच्या भाषणातून, बोलण्यातून त्यांनी कित्येक अनमोल विचारांचा ठेवा जगाला दिला. म्हणतात ना, एखादा सज्जन व्यक्ती जरी आपल्यातून सोडून गेला तरी त्यांचे चांगले विचार मात्र नेहमीच आपल्यामध्ये जिवंत राहतात.
अटलबिहारी वाजपेयी यांचे विचार देखील आपल्याला नेहमी प्रेरणा देतील असेच आहे. आपल्या भाषणात, बोलण्यात राजकारण वा अन्य गोष्टींविषयी ते अगदी रोखठोकपणे बोलत. पाहूयात त्यांचे हे रोखठोक विचार
1. शिक्षा का माध्यम मातृभाषा होनी चाहिए । ऊंची-से-ऊंची शिक्षा मातृभाषा के माध्यम से दी जानी चाहिए
2. सच सबसे बड़ा हथियार है और हर कोई जानता है की सरकारी जगहों पर हथियार लेकर नीहं जा सकते. Atal Bihari Vajpayee Birth Anniversary: सुशासन दिवस निमित्त जाणून घ्या दिवगंत पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचा राजकीय प्रवास
3. भूखमरी ईश्वर का विधान नहीं, मानवीय व्यवस्था की विफलता का परिणाम है
4. मेरे पास ना दादा की दौलत न बाप की लेकिन मेरे पास माँ का आशीर्वाद है
5. सारी दुनिया हमारे पास आ रहीं है, लेकिन हम इतने पागल है, की दूसरे देशों में जा रहे है
6. कडी मेहनत कभी थकान नहीं लाती, वो केवल संतोष लाती है
7. मैं हमेशा से ही वादे लेकर नहीं आया, बल्कि इरादे लेकर आया हूँ
8. पारस्परिक सहकारिता और त्याग की प्रवृत्ति को बल देकर ही मानव-समाज प्रगति और समृद्धि का पूरा-पूरा लाभ उठा सकता है
9. लोकतंत्र एक ऐसी जगह है, जहां दो मूर्ख लोग मिलकर एक पॉवरफुल इन्सान को हरा देते है
10. मेरा पर्सनल एक्सपीरियंस है हम दोस्त बदल सकते है, लेकिन पडोसी नहीं
ज्येष्ठ संसदपटू असलेले अटल बिहारी वाजपेयी राजकारणात चार दशक सक्रीय होते. श्री. वाजपेयी नऊ वेळा लोकसभेवर तर दोनवेळा राज्यसभेवर निवडून आले होते हाही एक प्रकारचा विक्रमच आहे. स्वातंत्र्योत्तर काळात भारताचे अंतर्गत व परकीय धोरणास आकार देण्यात एक पंतप्रधान, परराष्ट्र मंत्री, विविध स्थायी समित्यांचे अध्यक्ष व एक विरोधी पक्ष नेते म्हणून त्यांनी समर्थपणे भूमिका बजावली. अखेर 16 ऑगस्ट 2019 रोजी आजारापणात त्यांचे निधन झाले. लोकांच्या मनात राजकारणाचे एक वेगळेच चित्र निर्माण करणा-या भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांना कोटी कोटी प्रणाम!