Ashadhi Ekadashi Rangoli Designs 2020: आषाढी एकादशी दारापुढे 'या' सुरेख रांगोळ्या काढून विठूरायाला करा प्रसन्न, Watch Videos
यामुळे घरातही चैतन्यमय वातावरण निर्माण होते. आषाढी एकादशी निमित्त तुम्हालाही आपल्या दाराबाहेर रांगोळी काढायची असेल तर पाहा काही सुंदर रांगोळ्याचे व्हिडिओज
Ashadhi Ekadashi Rangoli Designs: वर्षभरात येणा-या एकादशींपेक्षा सर्वात महत्त्वाची समजली जाणारी 'आषाढी एकादशी' (Ashadhi Ekadashi) ही महाएकदशी म्हणूनही संबोधली जाते. पंढपूरातील आषाढी एकादशीचा उत्सव हा डोळ्यांचं पारणं फेडणारा असतो. हा सोहळा 'याचि देही याचि डोळा' पाहायला मिळणे हे विठ्ठलभक्ताचे भाग्यच समजावं लागेल. या सोहळ्यासाठी चंद्रभागेची तीरी विठुरायाच्या लाडक्या भक्तांची, वारक-यांची अलोट गर्दी पाहायला मिळते. यंदा कोरोना व्हायरसचे सावट या सोहळ्यावर पडले आहे. यामुळे अनेक भक्त घरात राहूनच आपल्या विठू माऊलीचा धावा करतील. आपल्या घराबाहेर छान रांगोळी काढून, विठूरायाची मनोभावे पूजाअर्चा करून, घरात गोडाधोडाचे जेवण करून हा सण साजरा करतील.
सणासुदी दिवशी दाराबाहेर सुरेख रांगोळी काढणे शुभ मानले जाते. यामुळे घरातही चैतन्यमय वातावरण निर्माण होते. आषाढी एकादशी निमित्त तुम्हालाही आपल्या दाराबाहेर रांगोळी काढायची असेल तर पाहा काही सुंदर रांगोळ्याचे व्हिडिओज:
विम बॉटलने काढलेली रांगोळी
विठूरायाची रांगोळी
संस्कार भारती:
हेदेखील वाचा- Ashadhi Ekadashi 2020 Wishes: आषाढी एकादशी निमित्त Images, WhatsApp Status, Messages द्वारे द्या शुभेच्छा!
आषाढी एकादशीला पांडुरंगाचे दर्शन घेण्यासाठी महिन्याभर आधीच पंढरीची वारी निघते. यात सर्व वारकरी अगदी भक्तीभावाने आणि श्रद्धेने सहभागी होतात. टाळ, मृदंग, तुळस, भगवी पताका घेत नाचत-गात, भजन कीर्तनांनी वारी निनादून जाते. यंदा कोविड-19 मुळे या प्रथेवर काही मर्यादा आल्या तरी तुम्ही आहे त्या ठिकाणी घरबसल्याही हा सण मोठ्या आनंदात आणि उत्साहात साजरा करु शकता.