Ashadhi Ekadashi 2020 Vitthal Rukmini Live Darshan: आषाढी एकादशी निमित्त पंढरपूरच्या विठ्ठल-रूक्मिणीचं इथे घ्या थेट दर्शन!

ऑनलाईन प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून विठू माऊलीच्या भक्तांना घरबसल्या पंढरपूरच्या (Pandharpur) विठ्ठल- रूक्मिणी मंदिरातील थेट सोहळा लाईव्ह पाहता येणार आहे.

Ashadhi Ekadashi 2020 | Photo Credits: Twitter/PandharpurVR

Pandharpur Vitthal Rukmini Live Darshan: महाराष्ट्रामध्ये घोंघावत असणार्‍या कोरोना व्हायरस (Coronavirus) संकटामुळे यंदा आषाढी एकादशी 2020 चं रूपचं पालटलं आहे. कडेकोत बंदोबस्तामध्ये, मोजक्या लोकांच्या उपस्थितीमध्ये यंदा देवशयनी आषाढी एकादशी (Devshayani Ashadhi Ekadashi) पंढरीत साजरी होत आहे. राज्यात मंदिरं बंद असल्याने, पंढरपुरामध्ये कडक संचारबंदी असल्याने यंदा विठ्ठल रूक्मिणीच्या भाविकांना त्यांचं मंदिरामध्ये दर्शन घेणं शक्य नाही. परंतू काही ऑनलाईन प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून विठू माऊलीच्या भक्तांना घरबसल्या पंढरपूरच्या (Pandharpur) विठ्ठल- रूक्मिणी मंदिरातील थेट सोहळा लाईव्ह पाहता येणार आहे. विठ्ठल रूक्मिणी मंदिराच्या vitthalrukminimandir.org या अधिकृत संकेतस्थळावर त्याची खास सोय करण्यात आली आहे.

दरम्यान 24 मार्च दिवशी कोरोनाची दहशत पाहता लॉकडाऊन सुरू झाला तेव्हापासूनच विठ्ठल रखुमाईचं पंढरपुरातील मंदिर बंद आहे. मात्र पुरेशी खबरदारी घेऊन नित्य पूजा आणि अन्य षोडोपचार सुरू ठेवण्यात आले होते. मात्र यंदा वारकर्‍यांची पायी वारी रद्द करून संतांच्या पालख्या आणि पादुका विशेष एसटी बसने पंढरपुरात दाखल झाल्या. Ashadhi Ekadashi 2020 Wishes: आषाढी एकादशीच्या मराठी शुभेच्छा, Messages, Images शेअर करून विठूभक्तांना द्या देवशयनी एकादशीच्या शुभेच्छा.

श्री विठ्ठल-रुक्मिणीचे असे होणार ऑनलाईन थेट दर्शन

• संकेतस्थळ- vitthalrukminimandir.org/onlineDarshan 

• गुगल प्ले स्टोअरवरील ॲप- shreevitthalrukmnilive Darshan

• जिओ टीव्ही- जिओ दर्शन

• टाटा स्काय- ॲक्टिव्ह चॅनेल

दरम्यान यंदा आषाढी एकादशी निमित्त मंंदिरात भाविकांना प्रवेशबंदी आहे. यासोबतच चंद्रभागेमध्ये स्नान करण्यासाठी देखील बंदी घालत भाविकांना घरीच राहून आषाढी एकादशी साजरी करा असं आवाहन करण्यात आलं आहे.

देवशयनी आषाढी एकादशी ही वारकर्‍यांसह महाराष्ट्रातील विठ्ठल भक्तांसाठी खास आहे. या दिवशी अनेकजण एकादशीचं एकदिवसीय व्रत पाळून विठ्ठळ-रूक्मिणीची आराधना करतात. तसेच आषाढी एकादशीपासून पुढील चार महिन्यांसाठी चातुर्मास देखील सुरू होतो. या चार महिन्यांच्या काळात देव निद्रावस्थेमध्ये असतात. तर मंगलकार्यात व्यर्ज असतात. अनेक मंडळी आषाढी एकादशी ते कार्तिकी एकादशी अशा चार महिन्यांच्या काळात कांदा, लसूण, वांगं खाणं टाळतात.