Angarki Sankashti Chaturthi Images: अंगारकी संकष्टी चतुर्थीच्या शुभेच्छा WhatsApp Status, Facebook Messages द्वारा देत खास करा आजचा दिवस

यंदा अंगारकी संकष्ट चतुर्थी मंगळवार, २९ सप्टेंबर २०२६ रोजी येत असून, संकष्टी चतुर्थी मंगळवारी आल्याने हा योग विशेष शुभ आणि फलदायी मानला जातो. मग या दिवसाचा आनंद द्विगुणित करण्यासाठी शेअर करा मराठमोळी शुभेच्छापत्रं!

Angarki Sankashti Chaturthi Images: अंगारकी संकष्टी चतुर्थीच्या शुभेच्छा WhatsApp Status, Facebook Messages द्वारा देत खास करा आजचा दिवस
अंगारकी संकष्टी चतुर्थी

नुकत्याच पार पडलेल्या बारा दिवसांच्या गणेशोत्सवानंतर आता येत्या मंगळवारी अंगारकी संकष्टी चतुर्थीचा (Angarki Sankashti Chaturthi) योग आला आहे. गणपती बाप्पाच्या भक्तांसाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जाणारा 'अंगारकी संकष्ट चतुर्थी' हा दिवस यंदा मंगळवार, 29 सप्टेंबर 2026 रोजी आहे. दर महिन्याला कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथीला येणारी संकष्टी चतुर्थी जेव्हा मंगळवारी येते, तेव्हा तिला 'अंगारकी चतुर्थी' असे संबोधले जाते, आणि हा योग विशेष शुभ व पुण्यदायी मानला जातो. मग अशा या मंगलमयी दिवशी तुमच्या गणेशभक्त मित्र-मंडळींना, नातेवाईकांना, आप्तेष्टांना अंगारकी चतुर्थीच्या शुभेच्छा WhatsApp Status, Facebook Messages Wishes, Images, Quotes च्या माध्यमातून शुभेच्छा देत हा दिवस थोडा अजून खास करायला विसरू नका.

संकष्टी चतुर्थीचे व्रत विशेषतः पश्चिम आणि दक्षिण भारतात, विशेषतः महाराष्ट्र आणि तमिळनाडूमध्ये मोठ्या श्रद्धेने पाळले जाते. महाराष्ट्रात गणपती हे आराध्य दैवत मानले जात असल्याने, संकष्टी चतुर्थी आणि विशेषतः अंगारकी चतुर्थीचे व्रत घरोघरी मोठ्या भक्तिभावाने केले जाते.

 अंगारकी संकष्ट चतुर्थीच्या शुभेच्छा

अंगारकी संकष्टी चतुर्थी
अंगारकी संकष्टी चतुर्थी
अंगारकी संकष्टी चतुर्थी
अंगारकी संकष्टी चतुर्थी
अंगारकी संकष्टी चतुर्थी

जेव्हा कोणतीही संकष्टी चतुर्थी मंगळवारी येते, तेव्हा ती 'अंगारकी चतुर्थी' म्हणून विशेष पुण्यदायी मानली जाते. भक्तांनी या दिवशी श्रद्धेने व्रत पाळून गणेशाचे स्मरण केल्यास जीवनातील संकटे दूर होतात आणि सुख-समृद्धी प्राप्त होते, असा या परंपरेमागील विश्वास आहे. या दिवशी कांदा, लसूण, मांस, मासे आणि मद्यपान यांसारख्या तामसिक पदार्थांचे सेवन टाळावे, असा संकेत दिला जातो.

(The above story first appeared on LatestLY on Sep 29, 2026 07:04 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).