Anant Chaturdashi Ganesh Visarjan: अनंत चतुर्दशी गणेश विसर्जनाच्या दिवशी घरच्या घरी बाप्पाच्या निरोपाची उत्तर पूजा, मंत्र, विधी घ्या जाणून!

यासाठी उत्तरपूजा (Uttar Puja) कशी कराल? कोणत्या मंत्रोच्चाराच्या (Mantra) जयघोषामध्ये बाप्पाला निरोप द्याल? हे सारं नक्की जाणून घ्या

Ganpati Gauri Visarjan Quotes (Photo Credits: File Image)

Anant Chaturdashi Ganesh Visarjan Mantra, Puja Vidhi:  महाराष्ट्रासह जगभरात यंदाच्या गणेशोत्सवाची सांगता आज अनंत चतुर्दशीच्या (Anant Chaturdashi) दिवशी केली जाणार आहे. दरम्यान यंदा गणेशभक्तांना कोरोना व्हायरसचं जागतिक आरोग्य संकट पाहता हा सण आणि गणेशोत्सव अत्यंत साधेपणाने साजरा करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. दरम्यान यामध्ये ढोल-ताशा, मिरवणूका, गुलालाची उधळण आणि गणेशभक्तांच्या गर्दी शिवाय विसर्जन (Ganpati Visarjan) करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. त्यामुळे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ ते अगदी घरगुती गणपती यांचं विसर्जन अगदी साधेपणाने घरच्या घरीच केले जाणार आहे. यासाठी उत्तरपूजा (Uttar Puja) कशी कराल? कोणत्या मंत्रोच्चाराच्या (Mantra) जयघोषामध्ये बाप्पाला निरोप द्याल? हे सारं नक्की जाणून घ्या. Anant Chaturdashi 2020 Quotes: अनंत चतुर्दशी ला मराठमोळे मेसेजेस, WhatsApp Status च्या माध्यमातून गणेशभक्तांसाठी खास करा बाप्पाच्या विसर्जनाचा दिवस

यंदा महाराष्ट्रामध्ये मुंबईचा राजा अशी ओळख असणारा लालबागच्या गणेशगल्लीचा राजा असो किंवा पुण्यातील मानाचे 5 गणपती, श्रीमंत दगडूशेठ गणपती यांचे विसर्जन देखील अत्यंत साधेपणाने केले जाईल. हे विसर्जन देखील कृत्रिम तलावांमध्येच सभा मंडपात होणार आहे. मग तुम्ही देखील त्यांच्याकडून प्रेरणा घेत घरच्या घरी गणेश मूर्ती विसर्जित करणार असाल तर पहा त्याची सविस्तर उत्तर पूजा विधी.

अनंत चतुर्दशी उत्तर पूजा विधी

घरातील 10 दिवस विराजमान बाप्पाच्या मूर्तीतील ज्येष्ठ व्यक्ती विसर्जनापूर्वी मंत्रोच्चाराने गणेश चतुर्थी दिवशी केलेली प्राणप्रतिष्ठेच्या माध्यमातील केलेलं देवत्त्व काढून घेतात. निरोपाची एकत्र आरती म्हणून बाप्पाला विसर्जनाला नेले जाते. दरम्यान घरच्या घरी मोठा टब, बादली, घंघाळामध्ये बाप्पाला विसर्जित करण्यापूर्वी त्यामध्ये स्वच्छ पाणी भरून त्यामध्ये हळद-कुंकू, फुलांच्या पाकळ्या, गंगेचे पाणी मिसळून ठेवा. विसर्जनाची मूर्ती 3 वेळेस पाण्यात भिजवून नंतर पूर्ण मूर्ती बुडवा. गणेश विसर्जनानंतर पाटाची पुन्हा आरती करून नैवेद्य, प्रसादाचे वाटप करून श्रीगणेशाला अखेरचा निरोप द्या. बाप्पाला निरोप देताना दही-भाताचा नैवेद्य शिदोरी म्हणून सोबत देण्याची प्रथा आहे.

अनंत चतुर्दशी उत्तर पूजा मंत्र

आवाह्न न जानामि न जानामि विसर्जनम।

पूजां च न जानामि क्षमस्व परमेश्वरम।।

मन्त्रहीनं क्रियाहीनम भक्तिहीनम सुरेश्वर।

यत्पूजितं मयादेव परिपूर्ण तदस्तु मे।।

कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव पाहता यंदा गणेशोत्सव अत्यंत साधेपणाने साजरा करण्याचं आवाहन करण्यात आले होते. यामध्ये समुद्र किंवा तलावावर विसर्जनासाठी गर्दी टाळण्यासाठी मुंबईत पालिकेकडून ऑनलाईन वेळ घेण्याची सोय देखील देण्यात आली होती. तसेच विसर्जनाच्या ठिकाणी लहान मुलं, ज्येष्ठ मंडळींना मज्जाव असेल. त्यामुळे घरातल्या व्यक्तींसोबत अत्यंत साधेपणाने गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या जयघोषात निरोप द्या.

(टीप: वरील लेख हा केवळ माहिती देण्याच्या उद्देशाने लिहला आहे. कोणत्याही धार्मिक भावना दुखावण्याचा, अंधश्रद्धा पसरवण्याचा लेटेस्टली मराठीचा उद्देश नाही. )