IPL Auction 2025 Live

Ashadhi Ekadashi Wari 2019: यंदा 24 जूनला होणार 'संत तुकाराम महाराज पालखी' चं प्रस्थान; पहा गोल रिंगण, उभं रिंगण कधी असेल?

संत तुकारामांचे जन्मस्थान देहू येथून होणार 24 जूनला तुकाराम महाराजांच्या पालखीचं प्रस्थान; तर पहिलं रिंगण 4 जुलै दिवशी रंगणार आहे.

Sant Tukaram Palkhi Sohala (Photo Credits: Commons.Wikimedia)

Sant Tukaram Palkhi 2019 Schedule: आषाढी आणि कार्तिकी एकादशी जवळ आली की वारकरी बांधवांना पंढरपूरचे वेध लागतात. सुमारे 250 किमीचा रस्ता 21 दिवसांच्या पायी प्रवासाने पूर्ण करून अनेक वारकरी पंढरपूरामध्ये विठ्ठल-रुक्मिणीचं दर्शन घेण्यासाठी पोहचतात. यंदा 12 जुलै दिवशी आषाढी एकादशी (Ashadhi Ekadashi) आहे. त्यामुळे वारकरी यंदा 24 जून दिवशी संत तुकाराम (Sant Tukaram) आणि 25 जून दिवशी संत ज्ञानेश्वर (Sant Dyaneshwar) यांच्या पालखीचं प्रस्थान होणार आहे. संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम महाराज आषाढी वारी पालखी 2019 वेळापत्रक जाहीर

संत तुकाराम पालखी सोहळा 2019 कसा असेल?

संत तुकाराम यांची पालखीचं प्रस्थान देहू येथून होते. यंदा 24 जून दिवशी त्याचं प्रस्थान होणार आहे. ही पालखी आकुर्डी, लोणी कालभोर,यावत, वरवंद, बारामती, इंदापूर, अकलूज, वखरी या भागातून जाणार आहे. विठ्ठल-रखुमाई च्या भाविकांसाठी एसटी सज्ज; आषाढी एकादशी च्या काळात धावणार 3724 विशेष गाड्या

संत तुकारामांची पालखी 24 जूनला देहूवरून निघेल. त्यानंतर पहिला थांबा इनामदारवाडा येथे असेल.

तुकारामांच्या पालखीमध्ये 'रिंगण' हे विशेष आकर्षण असते. यामध्ये 'गोल रिंगण' आणि उभे रिंगण अशा दोन प्रकारचे रिंगण पाहता येतात. गोल रिंगणामध्ये पालखीभवती नागरिक मानवी साखळी करून फेर धरतात. त्यानंतर दोन मानाचे घोडे गोलाकार फिरतात मात्र यामध्ये एकच घोडेस्वार असतो. दुसर्‍या घोड्यावर संत तुकाराम स्वार असतात असा वारकर्‍यांचा विश्वास आहे. त्यानंतर या गोलाकार रिंगणाभोवतालची माती उचलण्यासाठी वाराकर्‍यांची गर्दी असते. त्यानंतर उभ्या रिंगणादरम्यान वारकरी सरळ रेषेत उभ्याने राहून उड्या मारतात.