Sankashti Chaturthi Wishes: संकष्टी चतुर्थी च्या मराठी शुभेच्छा Messages, Whatsapp Status च्या माध्यमातुन देत करा गणरायला वंंदन

Sankashti Chaturthi HD Images (Photo Credits: File)

Sankashti Chaturthi August 2020 Marathi Wishes: आज शुक्रवार, 7 ऑगस्ट रोजी श्रावण महिन्यातील संकष्टी चतुर्थी आहे. सर्व गणेशभक्तांसाठी संकष्टी चतुर्थीचा दिवस अत्यंत खास आणि महत्त्वाचा असतो. या दिवशी मुंबईतील सिद्धीविनायक मंंदिरापासुन ते अन्य अनेक गणेश मंदिरात भाविक तुफान गर्दी करतात मात्र यावेळेस कोरोना व्हायरसच्या संकटामुळे अद्याप राज्यातील मंदिरे खुली करण्यात आलेली नाहीत. त्यामुळे सर्व भाविकांना घरच्या घरी पूजा करावी लागणार आहे. आपणही आयुष्यातील संकट, विघ्न दूर करुन सुख, समृद्धी, आनंद, यश लाभावे म्हणून विघ्नहर्त्याची पूजा, प्रार्थना करु शकता. तसेच या खास दिवशी आपल्या प्रियजनांंना सुद्धा शुभेच्छा देऊन त्यांचाही दिवस खास करु शकता. याकरिता काही संकष्टी चतुर्थी च्या मराठी शुभेच्छा देणारे Messages, Wishes, Images खाली देत आहोत हे डाउनलोड करुन तुमच्या Whatsapp Status, Facebook Wall वर शेअर करु शकता.  (हे ही वाचा - श्रावण महिन्यातील संकष्टी चतुर्थी निमित्त कशी कराल गणरायाची पूजा? जाणून घ्या चंद्रोदयाची वेळ)

संकष्टी चतुर्थी च्या मराठी शुभेच्छा

Sankashti Chaturthi Wishes (Photo Credits: File Image)
Sankashti Chaturthi Wishes (Photo Credits: File Image)
Sankashti Chaturthi Wishes (Photo Credits: File Image)
Sankashti Chaturthi Wishes (Photo Credits: File Image)
Sankashti Chaturthi Wishes (Photo Credits: File Image)

दरम्यान, संकष्टी चतुर्थी निमित्त गणपती स्तोत्र, अथर्वशीर्ष पठण करुन गणरायाला वंदन केले जाते. श्रीगणेश आराध्य देवता असल्याने कोणतंही शुभ काम सुरु करण्यापूर्वी गणरायाची पूजा केली जाते.

यंंदा 22 ऑगस्ट रोजी भाद्रपदातील गणेशोत्सव सुरु होणार आहे, याही सणावर कोरोनाचे सावट असेल, त्याआधी आलेली ही संकष्टी चतुर्थी येऊ घातलेल्या गणेशोत्सवाची नांदी म्हणुन जोरदार साजरी करा, पण हो घरी राहुनच. संकष्टी चतुर्थी च्या तुम्हा सर्वांना खुप खुप शुभेच्छा!