File photo for representation only

4 years of Uri Terror Attack:  जम्मू कश्मीर (Jammu Kashmir) मध्ये भारतीय लष्कराने 18 सप्टेंबर 2016 साली मागील 2 दशकातील म्हनजेच 20 वर्षांतला भीषण दहशतवादी हल्ला अनुभवला होता. या घटनेला आज 4 वर्ष पूर्ण होत आहेत. 4 दहशतवाद्यांनी उरी भागातील आर्मीच्या (Indian Army)  12 Brigade HQ मध्ये हल्ला केला होता. दहशतवाद्यांकडून ग्रेनेड आणि अन्य शस्त्रास्त्रांच्या मदतीने हल्ला करण्यात आला होता. सोबतच कॅम्प मधील फ्युअल डेपो उडवण्याचा प्रयत्न झाला होता. यामध्ये 18 जवान शहीद झाले तर 30 जणांनी आपला जीव गमावला होता.

दहशतवादी पूर्ण तयारीमध्ये कॅम्पमध्ये घुसले होते. त्यांनी अवघ्या 3 मिनिटामध्ये 17 हॅन्ड ग्रेनेड फेकले होते. तर 6 तासांच्या चकमकीमध्ये भारतीय जवानांनी चारी बाजूने दहशतवाद्यांवर हल्ला करून त्यांना ठार केले होते. या घटनेच्या 10 दिवसांनंतर भारतीय लष्करी दलाने सर्जिकल स्ट्राईक करत उरी हल्ल्याचा बदला घेतला होता.

उरी चा बदला सर्जिकल स्ट्राईकने

उरी प्रांतातील दहशतवादी बदला घेण्यासाठी भारतीय सेनेकडून 10 दिवसांनी हल्ला करण्यात आला. त्यामध्ये 150 जवानांचा समावेश होता. या कमांदोजकडून सर्जिकल स्ट्राईक करण्यात आले. भारतीय जवानांनी 28-29 सप्टेंबरच्या अर्ध्या रात्री दुश्मनांच्या सीमेमध्ये 3 किमी आत घुसून हल्ला करण्यात आला. या हल्ल्यामध्ये 2 पाकिस्तानी सैनिकांसोबत 40 आतंकवाद्याचा खात्मा करण्यात आला. या हल्ल्याच्या माध्यमातून भारताचं नवं रूप जगाने बघितलं.

कमांडोज तवोर, एम 4 सारख्या रायफल, ग्रेनेड्स, स्मोक ग्रेनेड्स यांचा समावेश होता. त्यांच्याकडे अंडर बॅरल ग्रेनेड, रात्री अंधारात पाहण्यासाठी नईट व्हिजन डिव्हाईस अअणि हेल्मेट माऊंटेड कॅमेरा होता.